शोध न्यूज : मोठ्या चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मतदार परदेशात आणि त्याचे मतदान मात्र महाराष्ट्रात अशी घटना उघडकीस आली असून त्याबाबत तक्रार देखील करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु होती. यात अनेक वेगळे आणि धक्कादायक प्रकार देखील समोर आले आहेत. यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झालेली होती. काही करून आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी ग्रामीण भागात देखील अनेक भल्याबुऱ्या गोष्टी करण्यात आल्या. ओल्या पार्ट्या, आमिषे एवढेच काय पण भानामती, जादूटोणा अशा प्रकारचा देखील अवलंब झाला. लक्ष्मीदर्शन देखील अनेक गावात झाल्याच्या चर्चा आता उघडपणे होऊ लागल्या आहेत. या चर्चा रंगत असतानाच बीड जिल्ह्यातील एक घटना वादाची ठरली आहे आणि यामुळे निवडणूक प्रक्रिया देखील अडचणीत येताना दिसत आहे. निवडणुकीत तोतयेगिरी करणे, बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणे अशा बाबी घडत असतात पण परदेशात असलेल्या मतदाराचे मतदान बीड जिल्ह्यात झाल्याची बाब उघड झाल्याने वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान झाले परंतु बीड चील्यातील चिखली येथील एक मतदान वादाचे आणि चर्चेचे ठरले आहे. चिखली मतदान केंद्र क्रमाक २ वर मतदार यादीत १४५ क्रमांकावर शेख शकील बाबामिया यांचे नाव आहे परंतु हे मतदार गावात तर नाहीत्रच परंतु ते भारतात देखील नसतात. ते दक्षिण आफ्रिकेत राहत आहेत आणि ते परदेशात असताना त्यांचे मतदान मात्र चिखलीच्या मतदान केंद्रावर नोंदले गेले आहे. ( Bogus voting revealed in Gram Panchayat elections) हा प्रकार लक्षात येताच मोठा आक्षेप घेण्यात आला असून तालुका निवडणूक अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्षावर याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. उमेदवार निवडून यावा म्हणून अनेक बोगसगिरीचे प्रकार झाल्याचे आरोप होत असतानाच ही मोठी तक्रार झाली असून यामुळे गोंधळ उडाला.
बटणाखाली फेव्हिकॉल !
निवडणुकीच्या काळात अनेक विचित्र घटना समोर येतात परंतु बीड जिल्ह्यात लिंबा गणेश मतदान केंद्रावर तर भलताच वेगळा प्रकार आढळून आला. सरपंच पदाच्या निवडणुकीतील मतदानावेळी मतदान यंत्रातील एका बटणाच्या खाली कुणीतरी फेव्हिकॉल ओतल्याची बाब समोर आली. हा प्रकार नेमका कुणी केला हे समजू शकले नाही परंतु फेव्हिकॉलने मात्र घोटाळा केला आणि मतदान प्रक्रियेत बाधा आणली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !