BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ डिसें, २०२२

निसर्गाचा चमत्कार ! काळ्या म्हशीला पांढरे रेडकू !

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा वेगळा चमत्कार पहायला मिळाला असून काळ्या म्हशीने चक्क पांढरे रेडकू जन्माला घातले असून ही किमया पाहण्यासाठी नागरिक देखील गर्दी करू लागले आहेत.


निसर्ग कधी कधी आपला वेगळाच अविष्कार दाखवतो आणि पाहणारे केवळ थक्क होऊन पहातात. तसं पाहिलं तर निसर्गात सतत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. परिवर्तन हा तर निसर्गाचा नियमच आहे. निसर्ग नियमांच्या पेक्षा वेगळे काही घडले की प्रत्येकजण थक्क होतोच आणि अशा थक्क करणाऱ्या घटना अधूनमधून समोर येत असतातच. अनकेदा जीव  जन्माला येताना नेहमीपेक्षा वेगळा येतो आणि त्याची चर्चाही होते. प्राणी आणि माणसांबाबत हे कुतूहल अधिक असते. असाच प्रकार मोहोळ तालुक्यात समोर आला असून मोठ्या कुतूहलाने लोक हा वेगळा आविष्कार पहाण्यासाठी गर्दी करू लागले आहेत . काळ्या रंगाच्या एक म्हशीने पांढऱ्या रंगाच्या रेडकाला जन्म दिला आहे आणि याचे सगळ्यांचा अप्रूप वाटू लागले आहे. 


ही दुर्मिळ मानली जाणारी घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात घडली आहे. काळ्या म्हशीने दिलेल्या पांढऱ्या रेडकाला पाहायला गर्दी होऊ लागली आहे तशी या घटनेची चर्चाही परिसरात चांगलीच रंगू लागली आहे.राजकुमार कोटीवाले हे शेतकरी शेतीसोबत पशुपालन देखील करतात आणि त्यांच्याच म्हशीने हा चमत्कार दाखवला आहे. म्हैस अथवा रेदाकाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा एखादा ठिपका दिसतो अन्यथा म्हैस म्हटलं की ती काळ्या रंगाचीच असते. (Miracle of nature in Solapur district! White Redku to Black Buffalo)राजकुमार कोटीवाले यांच्या म्हशीने मात्र गाईच्या वासरासारखे पांढरेशुभ्र रेडकू जन्माला घातले आहे. ही दुर्मिळ घटना असल्याने चर्चा तर होणारच !


फांदीला बटाटे !

निसर्गनियमानुसार बटाटे हे जमिनीत लागतात. ते कधी झाडाच्या फांदीवर येत नाहीत परंतु फांदीला बटाटे लागल्याचे एक उदाहरण पुणे जिल्ह्यातून नुकतेच समोर आले आहे.  हा देखील  निसर्गाचा चमत्कार मानला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे हा अविष्कार समोर आला असून झाडाच्या फांद्यांना लहान मोठे अठरा बटाटे आल्याचे दिसून आले. कुतूहल निर्माण करणारा हा प्रकार पाहण्यासाठी शेतकरी आणि नागरिक यांनी गर्दी केली. त्यापाठोपाठ आता या पांढऱ्या रेडकाची चर्चा सुरु झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !