शोध न्यूज : ऊस तोडणी मजुरांना फसवून आणले आणि डांबून ठेवल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासह चार जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका आठवड्याचे मोफत रेशन आणि महिला तसेच पुरुष मजुराला पाचशे रुपयांची मजुरी देतो असे सांगून अल्पवयीन बाल मजुरासह पंधरा जणांना मध्य प्रदेशातून फसवून आणले, ऊस तोडणीसाठी म्हणून त्यांना बालाघाट येथून आणले परंतु येथे उपाशी ठेवत डांबून ठेवले म्हणून ढोक बाभूळगाव येथील एका शेतकऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाघाट जिल्ह्यातील कालावटी तांडा येथील मुकादम शेषराव यादव. गोंदिया जिल्ह्यातील गोकुळ हरिराम मेश्राम, परळी येथील किरण महादेव वायदंडे. बीड येथील इंदुबाई महादेव वायदंडे आणि ढोक बाभुळगाव येथील ट्रॅक्टर मालक छायाबाई संतोष शिंदे यांनी मध्य प्रदेशात जाऊन फुलसिंग इनवाती यांची भेट घेतली आणि मजुरांची मागणी केली.
ऊस तोडणीसाठी महिला मजुरास तसेच पुरुष मजुरास प्रत्येकी पाचशे रुपयांची मजुरी देऊ, त्यांना एका आठवड्याचे रेशन धान्य मोफत देवू अशी बतावणी देखील केली. त्यानुसार बारा पुरुष आणि तीन महिला मजुरांना अंबेजोगाई येथे आणण्यात आले. तेथून उसाची तोडणी असेल त्या ठिकाणी घेवून जातो असे सांगण्यात आले आणि ढोक बाभूळगाव येथे नेण्यात आले. हे मजूर येथे ऊसाची तोडणी करू लागले परंतु मोफत रेशन देतो असे सांगितले असतानाही प्रत्यक्षात दिले नाही. काही साहित्य देण्यात आले परंतु काही साहित्य दिले गेले नाही. ठेकेदार ट्रॅक्टर मालकास पैशाची व सामानाची मागणी केली असता पैसे व सामान तर दिलेच नाही. उसाची तोडणी मात्र त्यांच्याकडून बळजबरीने करून घेण्यात येवू लागली. कामात हयगय केली तर कारखान्यावर घेवून जाऊ आणि तेथे कोंडून ठेवू अशी धमकीही या मजुरांना देण्यात आली.
या मजुरांच्याकडे खाण्यापिण्याचे काहीच साहित्य शिल्लक उरले नसल्याने पंधरातील पाच मजूर परत आपल्या गावी निघून गेले. परत गावी गेलेल्या मजुरांनी बालाघाट जिल्हाधिकारी यांना भेटून ही कथा सांगितली त्यामुळे तेथून एक पथक मोहोळ येथे दाखल झाले. प्रवीण ईनवाती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि मध्य प्रदेशातील दहा मजुरांना ताब्यात घेण्यात आले. (Cheating of Sugarcane Cutting Labourers, Case File) ऊस तोडणी मजूर फसवणूक करतात असे प्रकार सतत घडतात परंतु हा प्रकार मात्र वेगळाच असून याबाबत पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !