BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ डिसें, २०२२

बहिणीपाठोपाठ दिव्यांग बालकाचाही उपोषणाने घेतला बळी !

 



शोध न्यूज : उपोषणाला बसलेल्या अवघ्या दहा वर्षाच्या दिव्यांग बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मानवतेला धक्का बसला असून या बालकाची तेरा वर्षे वयाची बहिण तीन महिन्यांपूर्वीच उपोषणादरम्यान मृत्युमुखी पडली होती. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. दिव्यांगासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाच टक्के निधी राखीव असतो परंतु गेल्या काही वर्षांपासून हा निधी मिळत नव्हता त्यामुळे चिखर्डे येथील कुरुळे कुटुंब आंदोलन करीत होते. ऑगष्ट महिन्यांपासून त्यांचा हा लढा सुरु असतानाच उपोषणाच्या दरम्यान या कुटुंबातील वैष्णवी कुरुळे या १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या मुलीचा मृत्यू झाल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती आणि जिल्हाधिकारी यांनी हा निधी देण्याची आणि संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु याप्रकरणी पुढे काहींही झाले नाही आणि आता एकाच कुटुंबातील दुसरा बळी गेला. बहिणीच्या पाठोपाठ भावाचाही या आंदोलनात मृत्यू झाला आहे. 


कुरुळे कुटुंबातील तेरा वर्षे वयाची मुलगी दिव्यांग निधीच्या उपोषणादरम्यान मृत्युमुखी पडली तरीही प्रशासन शांत होते. त्यानंतर या कुटुंबाने पुन्हा गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण सुरु केले होते. या उपोषणात दहा वर्षे वयाचा संभव कुरुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे. बहिणीचा मृत्यू अशाच प्रकारे झाला आणि त्यानंतर तीन महिन्यात भावाचा देखील मृत्यू उपोषणाच्या दरम्यान झाला. एकीकडे दिव्यांग व्यक्तीच्या आधारासाठी राजकीय व्यक्ती मोठमोठी भाषणे ठोकतात तर सरकार मोठमोठ्या घोषणा करीत राहते. प्रत्यक्षात दिव्यांग व्यक्तीची उपेक्षाच सुरु असून आता तर न्याय मागणी करताना देखील त्यांचाच बळी गेला आहे. या घटनेने सर्वसामान्य माणूस देखील कळवळला असून अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. 


लोकाशाही मार्गाने आंदोलन करीत असताना आणि आपल्या न्याय मागण्या मागण्यासाठी धडपड करीत असताना एकाच कुटुंबातील दोघांचा, सख्या भावंडाचा मृत्यू झाला असून महाराष्ट्राला कलंकित करणारी ही बाब ठरली आहे. (After the sister, the child also died on hunger strike)वैष्णवी आणि संभव या दोन्ही दिव्यांग भावंडांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार आहे असा स्पष्ट आरोप कुटुंबीयांनी केला असून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीवर ते ठाम असून त्यासाठी प्रहार संघटना देखील आक्रमक झाली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !