BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० डिसें, २०२२

जुळ्या बहिणींशी लग्न केलं, कायद्यानेही दिले 'आशीर्वाद' !




शोध न्यूज : एकाचवेळी एकाच मंडपात दोन जुळ्या बहिणीशी लग्नं केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असले तरी आता या विवाहास कायद्यानेच 'आशीर्वाद' दिला असून या प्रकरणातून नवरदेवाची सहीसलामत सुटका झाल्याचे दिसत आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील अतुल अवताडे याने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणीशी लग्न केले. एकाच मंडपात एकाच वेळी दोन बहिणीशी लग्न केल्याची चर्चा राज्यभर होत आहे. वेळापूरजवळ एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाले आणि असे लग्न करण्यामागचा हेतू देखील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचला. असे असले तरी देखील अकलूज जवळ असलेल्या माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी या लग्नाबाबत पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नवरदेव अतुल अवताडे याच्या विरोधात दाखल केला. हा विवाह चर्चेनंतर आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार असल्याचे संकेत मिळू लागले होते पण अखेर कायद्यानेही या लग्नाला आशीर्वादच दिला असल्याचे समोर आले आहे.   


अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अकलूज पोलिसांनी सोलापूर जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात परवानगी मागितली. न्यायालयाने चौकशी करण्याचा विषयच फेटाळून लावला आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यात चौकशीचे अधिकार मिळावेत यासाठी न्यायालयात मागणी केली पण  सीआरपीसीच्या कलम 198 चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगीच  नाकारण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रार करणारी व्यक्ती ही पिडीत पक्ष नाही, तक्रार करणारी व्यक्ती ही संबंधित कुटुंबातील सदस्य असावी. सदर खटल्यात तक्रार करणारी व्यक्ती ही पिडीत पक्ष नाही त्यामुळे सदर याचिकेची दखल घेवू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गाजलेल्या या प्रकरणात या विवाहाला कायद्याचा पाठींबा मिळाला आहे.  


या विवाहाची चर्चा राज्यभर प्रचंड गाजत राहिली पण या लग्नाला नापसंती दाखविणारेही काही जण पुढे आले. कायदा आता या विवाहाला दणका देणार असे अनेकांना वाटले होते पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. कायद्यापुढे देखील या विवाहाने काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. कलम ४९४  नुसार तक्रार करण्याचा अधिकार हा केवळ पती अथवा पत्नीलाच आहे. विवाह हा विषय केवळ दोन व्यक्तीपुरता मर्यादित असून तिसऱ्या व्यक्तीला याबाबत तक्रार करण्याचा अधिकार कायद्यानेच दिलेला नाही. या प्रकरणात राहुल फुले यांनी तक्रार केली आहे पण कायद्यानुसार त्यांची तक्रार वैध ठरत नाही. एकच वेळी दोन मुलींशी लग्न करण्यात आले परंतु यात एकही पत्नीची तक्रार नाही आणि त्रयस्थ व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार नाही त्यामुळे या प्रकरणातील हवाच निघून गेली आहे.


जेंव्हा दोन पत्नी असतात तेंव्हा कायद्याने पहिल्या पत्नीला विविध अधिकार प्रदान केलेले असतात पण या लग्नात पहिली पत्नी कोण?  या प्रश्न कायम अनुत्तरीत राहिला आहे. या लग्नाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालेली असून या विवाहात दोन्ही जुळ्या बहिणींनी एकत्रपणेच नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घातली आहे. त्यामुळे यातील पहिली पत्नी कोण आणि दुसरी कोण ? हे ठरवताच येत नाही. यातील पहिली पत्नी कोण आहे याचेच उत्तर सापडत नाही त्यामुळे कोणता विवाह अवैध ठरवायाचा ? हा कायद्यापुढे देखील मोठा पेच आहे.(Married to twin sisters, even the law gave 'blessings') त्यामुळे कायद्याचा आशीर्वाद या विवाहाला लाभला असल्याची नवी चर्चा आता सुरु झाली आहे.   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !