BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ डिसें, २०२२

अल्पवयीन मुलीवर अकरा नराधमांनी केला बलात्कार !

 



शोध न्यूज : महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत असतानाच पालघरमधून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामुहिक अत्याचार केला आहे.


महिलाविषयक अनेक प्रभावी कायदे केले गेले असतानाही महिलांवरील अत्याचार कमी झाला नाहीच उलट अलीकडे अल्पवयीन मुलीं देखील अशा अत्याचाराच्या बळी ठरू लागल्या आहेत. देशभर सगळीकडे रोज अशा लाजिरवाण्या आणि संतापजनक घटना समोर येत आहेत. आता तर महाराष्ट्राला हादरवून सोडणारी मोठी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामुदायिक बलात्काराची घटना घडली असून महाराष्ट्रात अशा घटना घडत नाहीत परंतु आता त्याही घडू लागल्याचे समोर आले आहे. या घटनेने मानवतेलाही मोठा धक्का बसला आहे. 


पालघर जिल्ह्यात माहीम येथील पानेरीजवळ निर्जन ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षे वयाच्या मुलीवर तब्बल ११ तरुणांनी एकाचवेळी सामुहिक बलात्कार केला आहे. माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई या भागातील हे सगळे नराधम असून यातील बहुतेक तरुण हे गर्दच्या आहारी गेलेले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस देखील हादरले असून सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (A minor girl was gang-raped by eleven youths) राक्षसी वृत्तीच्या ११ नाराधामापैकी ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून उरलेल्या ६ आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेने केवळ पालघरच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे.  



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !