BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ डिसें, २०२२

पंढरीत विठ्ठल भक्तांना हॉटेलच्या अन्नातून विषबाधा !

 



शोध न्यूज : विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीस भाविकांना विषबाधा झाल्याची मोठी घटना समोर आली असून यामुळे पुन्हा एकदा पंढरीतील भेसळीचा विषय ऐरणीवर आला आहे.


पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे दररोज भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात आणि शक्य तेथे त्यांना जेवण घ्यावे लागते. पंढरीत विषबाधा होण्याची ही काही पहिली घटना नसून यापूर्वी देखील अनेकदा विषबाधा झाली आहे. प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यातून तसेच बासुंदीमधूनही विषबाधा झाल्याची प्रकरणे या आधी घडलेली आहेत. (
Devotees poisoned by food in Pandharpur) आता पुन्हा हॉटेलमधील जेवणातून तीस पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेल्या अबेक भाविकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. 


अक्कलकोट, तूळजापूर अशा विविध तीर्थक्षेत्री प्रवास करून भाविक पंढरपूर येथे आले होते. त्यांनी पंढरपूर येथे आल्यावर नदीकाठावरील एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि जेवण करून बाहेर पडल्यापासून काही भाविकांना जुलाबाचा त्रास होऊ लागला. काही भाविकांना उलट्या होऊ लागल्या त्यामुळे भाविक उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या दोन हॉटेलमध्ये हे भाविक जेवले होते अशी माहिती या भाविकांकडूनच देण्यात येत आहे.  हा प्रकार समोर येताच पंढरीत खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन तेवढ्यापुरती कारवाई करते परंतु गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप नेहमीच होत असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तरी भाविकांची सुरक्षा विचारात घेवून या विभागाने सदैव सतर्क असण्याची गरज आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !