BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ डिसें, २०२२

शिंदे गटातील मंत्र्यांकडून पोलीसासमोरच मारहाण, शिवीगाळ !

 


शोध न्यूज : अश्लील भाषेत शिवीगाळ करीत शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला असून यामुळे आणखी एका आमदारांची अडचण होण्याची शक्यता आहे. 


शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांच्यापैकी काही आमदार हे सतत कुठल्या न कुठल्या वादात सापडत आहेत. काही आमदार असभ्य बोलत आहेत तर कुणी उघडरित्या धमक्या देत आहेत. एकापेक्षा एक असे प्रकार गाजत असताना आणि शिंदे गटातील आमदार वादग्रस्त ठरत असतानाच भूखंड घोटाळ्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडताना दिसत आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दीडशे कोटीच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून कालच विधानसभेत हंगामा झाला आणि मंत्री सत्तार यांना नॉट रिचेबल व्हावे लागले. पुन्हा पुन्हा वादात अडकणारे सत्तार सद्या मोठ्या अडचणीत येताना दिसत असून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. आज ते विधानसभेत उत्तर देणार आहेत. 


सत्तार यांच्यासह शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याचे नाव जमीन घोटाळ्यात पुढे येवू लागले असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटातील मंत्री दादा भुसे हे एका तरुणाला पोलिसासमोरच शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसत आहेत. यावर आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच काही प्रश्न विचारले आहेत. 


जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट

मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक  
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक  

आता बोला ! 


जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मंत्री दादा भुसे हे पोलिसांसमोर तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसत आहेत.  तरुण हात जोडत गयावया करीत आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे ? या तरुणाने काय गुन्हा केला होता ? याबाबत मात्र काही माहिती समजत नाही परंतु पोलीस सोबत असताना अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा हा प्रकार मंत्री दादा भुसे यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो. (Beating by ministers from Shinde group in front of police) हा विषय विधानसभा अधिवेशनात देखील उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !