BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२२

लाच घेताना कोषागार कार्यालयातील महिला कर्मचारी रंगेहात !

 



शोध न्यूज : शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच प्रकरण गाजत असतानाच सोलापुरात आणखी एक लाचखोर सापळ्यात अडकली असून कोषागार कार्यालयातील महिला लिपिक रंगेहात सापडली आहे.


लाचखोरीच्या प्रकरणात शासनाचे वेगवेगळे विभाग चर्चेत असून महसूल आणि पोलीस हा विभागांची प्रकरणे सतत घडत असतात. अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत अनेकजण लाचखोरीच्या प्रकरणात तुरुंगात जाऊन बसले असून अलीकडे महिला कर्मचारी, अधिकारी देखील लाचखोरीत अडकत आहेत. महिला अधिकारी आणि कर्मचारी देखील लाच घेण्यात तरबेज होत असल्याने येथेही महिला आघाडीवर असल्याने दिसून आले आहे. आज सोलापूर येथील कोषागार कार्यालयातील एक महिला लिपिक अश्विनी बडवणे यांच्यावर लाचखोरीची कारवाई झाली आहे. ट्रेझरी शासकीय कर्मचारी अधिकारी यांचे वेतन, वेतनातील फरक  तसेच तत्संबंधी प्रकरणे ट्रेझरीशी संबंधित असतात. कोषागार कार्यालयाने मंजूर केल्याशिवाय कर्मचारी, अधिकारी यांच्या रकमा मिळत नाहीत.


शासकीय कार्यालयाने तयार केलेली विविध बिले कोषागार कार्यालयाने मंजूर करावी लागतात. कोषागार कार्यालये काही न काही हरकत लावून बिले नामंजूर करतात आणि त्यामुळे चिरीमिरी हा विषय महत्वाचा बनू लागतो. अनेकदा बिले तयार करणारी कार्यालये यामुळे परेशान होताना दिसतात. कोषागार कार्यालायाबाबत सतत खाजगीत अनेक प्रकारचे रोष ऐकायला मिळतात. सेवानिवृत्ती वेतनाचा देखील कोषागार कार्यालायाशीच संबंध असतो. (
Women in Solapur treasury office red-handed in accepting bribes) अनकेदा निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्याना कोषागार कार्यालयाचा अत्यंत वाईट अनुभव येत असतो. अशाच प्रकारातून सोलापुरातील आजची कारवाई झाली आहे. 


शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळते. अशाच प्रकरणात आजची कारवाई झाली आहे. पोलीस खात्यात सेवा केलेल्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी कुटुंब निवृत्ती वेतन सुरु करण्यासाठी दिवंगत पोलीस कर्मचारी यांच्या मुलाने प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी ते वारंवार कोषागार कार्यालयात हेलपाटे मारत होते. सदर फाईल पुढे ढकलण्यासाठी या कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणे यांनी तक्रारदारास साडे चार हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारास अशी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि आपली तक्रार दिली. सदर विभागाने पडताळणी करून सापळा लावला आणि आज साडे चार हजार रुपयांची लाच घेताना सदर महिला कर्मचारी अश्विनी बडवणे रंगेहात सापडल्या.


तक्रारदाराने सदर महिला कर्मचाऱ्यास दीड हजार रुपये दिले होते तरी देखील त्यांचे समाधान होत नव्हते. आणखी लाच त्यांनी मागितली होती त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. या विभागाने सगळे सोपस्कार पार पाडत सापळा कारवाई केली आणि त्यात महिला कर्मचारी बडवणे या रंगेहात सापडल्या गेल्या. सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाने शिक्षणाधिकारी किरण लोहार हे नुकतेच २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडले आहेत. या घटनेची राज्यभर चर्चा सुरु असतानाच सोलापुरातच आणखी एक लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !