BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२२

सोलापूरसह चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !

 


शोध न्यूज : ऐन हिवाळ्यात पावसाळा येऊ लागला असून सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. 


कडाक्याच्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले असून तपमानात मोठी घट होत महाराष्ट्र थंडीने गारठू लागला असतानाच हिवाळ्यातील पावसाळा येऊ लागला आहे. अचानक तापमानात चढ उतार अनुभवयाला मिळू लागला असताना आता कडाक्याच्या थंडीच्या दिवसात दोन दिवस पाऊस होण्याचे अनुमान आहे. बंगालच्या उपसागरातील मैनदोस  चक्रीवादळाने तामिळनाडू राज्याला मोठा तडाखा दिला आहे. हे चक्रीवादळ आता विरून गेले आहे पण बंगालच्या उपसागरातच दक्षिण अंदमानजवळ चक्रीय हवेची स्थिती तयार होणार असल्यामुळे सातत्याने हवामानात बदल होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

 
उद्या १३ डिसेंबर रोजी बंगाल उपसागरात अंदमानाजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण होणार असून विदर्भ वगळता महाराष्ट्रात मुंबईसोबत कोकणातील ४ आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील १० जिल्हे पावसाने भिजणार आहेत. खानदेश, नाशिक ते सांगली आणि सोलापूरपर्यंत हा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही सध्या सुरू झाला आहे. पुढील दोन दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र, केरळ आणि कर्नाटक किनारी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ५५ किमी राहील. 


या दरम्यान समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. चकीवादळाचा प्रभाव म्हणून वाऱ्याचा दिशा आणि गती यामध्ये फरक पडला आहे क्रीवादळ विरले असून, केरळ-कर्नाटक सीमेवरील किनारपट्टीवर १३ डिसेंबरला पुन्हा अरबी समुद्रात ते उतरेल आणि त्याचे कमी दाब क्षेत्रात रूपांतरण होईल. ते पश्चिमेकडे निघून जाईल. वामानात होत असलेल्या बदलामुळे किमान तापमानात फार काही बदल होणार नाहीत, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.


पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यात कालपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झालेले असून तापमानात सतत बदल जाणवत आहे. अनके भागात रात्री किरकोळ स्वरूपाच्या पावसाच्या थेंबाने हजेरीही लावली आहे. (Possibility of heavy rain in fourteen districts including Solapur) ऐन थंडीत येऊ घातलेल्या या पावसाने वातावरण बदलत असून पुढील दोन दिवस या पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !