BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२२

आयशर टेंपोने उडवल्याने रिधोरे येथील तलाठ्याचा मृत्यू !

 


शोध न्यूज : कुर्डूवाडी- बार्शी रस्त्यावर रिधोरे येथे झालेल्या अपघातात जखमी झालेले तलाठी मधुकर दादा काळे यांचा अखेर मृत्यू झाला असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.


माळशिरस तालुक्यातील भांब येथील तलाठी मधुकर काळे हे माढा तालुक्यातील रिधोरे येथे कार्यरत होते. आपले काम आटोपून घराकडे परत निघालेले असताना त्यांना कुर्डूवाडी - बार्शी मार्गावर एका टेंपोने उडवले, समाधान महावीर गायकवाड आणि तलाठी मधुकर दादा काळे हे दुचाकीवरून (एम एच ४५ वाय ८११०) निघालेले असताना रिधोरे येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या जवळ त्यांना एका वाहनाने जोरदार ठोकर दिली होती.  पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेंपोने (एम एच ०४ इ वाय ८११०) काळे यांच्या दुचाकीला उडवले आणि अपघात झाला होता. या अपघातात रिधोरे येथील समाधान महावीर गायकवाड आणि तलाठी मधुकर काळे हे दोघेही जखमी झाले होते. अपघात झाल्यांनतर या दोघानाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात केलेला टेंपोचालक घटनास्थळावरून पळून गेलेला होता. 


अपघातानंतर रुग्णालयात उपचार घेत असतानाच तलाठी मधुकर काळे यांच्या मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघात केल्यानंतर टेंपो जागेवर सोडून पळून गेलेला चालक लखन जाधव (रा. केज, जि. बीड ) हा नंतर स्वत: होऊन पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. (Accident Kurduwadi- Barshi road-Death of injured Talathi) सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रिधोरे येथील जखमी समाधान गायकवाड यांच्या पायांना जबर मार लागला आहे. त्यांच्या  दोन्ही पायास मार लागला असून त्यांच्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !