शोध न्यूज : आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी न केल्याने मंडलाधिकारी यांना निलंबित करण्याची कारवाई सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. या थेट कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
सामान्य जनतेला महसूल विभागातील कर्मचारी मंडळीचा अनुभव असतोच. कित्येकदा ही मंडळी सामान्य कामासाठी देखील जनतेला नाडवत असतात. यामुळे महसूल विभागाकडील काम अनेकदा जिकीरीचे वाटत असते. सामान्य माणसाला बहुतेक वेळा वाईट अनुभव येत असतोच पण आता वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशालाही न जुमानल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एका मंडलाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पुनर्वसित लोकांना देण्यात येणाऱ्या जमिनीवर नोंदी घेताना जुन्या आदेशाची अंमलबजावणी न करता नव्या आदेशाचा अंमल करावा अशा सूचना विभागीय आयुक्त यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत परंतु मंडलाधिकारी प्रशांत भीमाशंकर सुरे यांनी हा आदेश मानला नाही. पुनर्वसित जमीन वाटपाच्या नोंदी करताना तिऱ्हे येथील मंडलाधिकारी सुरे यांनी नोंदी करताना जुन्याच आदेशाची अंमलबजावणी केली.
या प्रकरणी तक्रारी आल्यानंतर तिऱ्हे येथे पुनर्वसनांतर्गत केलेल्या जमीन वाटपाच्या प्रकरणाच्या कामाच्या तपासणीसाठी समिती नेमण्यात आली होती. या चोकशी समितीने केलेल्या चौकशीत काही बाबी गंभीर असल्याचे समोर आले होते. या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंडलाधिकारी प्रशांत सुरे यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. (Disobeyed the orders of superiors, Circle Officer suspended) या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना स्पष्ट आणि लेखी सूचना दिलेल्या असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही याचे देखील मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !