BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मार्च, २०२२

पंधरा लाख बिल भरून शेतकरी झाला थकबाकीमुक्त !



नाशिक : वीज तोडण्याची मोहीम तीन महिने स्थगित होत असतानाच एका  शेतकऱ्याने तब्बल पंधरा लाखांचे थकित वीज बिल भरून  थकबाकीमुक्तीचा सन्मान मिळवला आहे. 


हजारो कोटी रुपयांची बाकी थकल्यामुळे महावितरण 'आजारी' पडले आहे तर ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा तोडला जात असल्याने शेतकरी हैराण होऊन रस्त्यावर उतरला. शेतकऱ्याची पिके एकीकडे जळत असताना दुसरीकडे राज्यात राजकारण देखील रंगलेले महाराष्ट्राने पहिले आणि आज अखेर शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार झाला आणि  तीन महिने वीज तोडणी मोहीम स्थगित करण्यात आली. एकीकडे आंदोलना गर्दी होत राहिली तर वीज वितरण कंपनीची वसुली खिडकी मात्र रिकामीच राहिली. अशा परिस्थिती आज शासनाने कारवाई थांबवली असली तरी एका शेतकऱ्याने तब्बल पंधरा लाकांचे वीज बिल भरले (Millions of overdue electricity bills paid by farmers) आणि थकबाकीमुक्त झाले असल्याची सकारात्मक बाब समोर आली. 


उर्जा मंत्र्यांचे आवाहन !
महावितरण ही शासनच्या मालकीची कंपनी आहे, शासनाकडून मिळणारे अनुदान, वीज बिलाचे मिळणारे पैसे हेच उत्पन्नाचे साधन आहे. ६४ हजार कोटी एवढी थकबाकी आहे त्यातील शेती पंपाची थकबाकी ४४ हजार ९२० कोटी रुपये आहे त्यामुळे सरकार काही मुद्दाम वीज खंडित करीत नाही. मागच्या सरकारने शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत.  विजेचाही तुटवडा झाला  तरी भार नियमन होऊ दिलेले नाही. शेतकरी करीत असलेल्या मागणीचा विचार करतो पण महावितरणचा देखील विचार करावा.  शेतकऱ्यांची वीज तोडणी आम्ही थांबवत आहोत पण सवलत दिली असली तरी शेतकऱ्यांनी वेळेत बिले भरावीत असे आवाहन उर्जामंत्री यांनी केले तर दुसरीकडे तळोदा तालुक्यातील शेतकरी हाजी निसारआली शेरमोहम्मद मक्राणी यांनी आपल्याकडे असलेले पंधरा लाखांचे थकीत वीज (Electricity arrears) बिल महावितरणकडे भरले.


शेतकऱ्याचा सत्कार !
महावितरण (MSEDCL) आणि शेतकरी यांच्यातील दुरावा सद्या वाढत चाललेला असताना महावितरणने हाजी निसारआली शेरमोहम्मद मक्राणी या शेतकऱ्याचा सत्कार केला. स्वत: मोठ्या रकमेचे बिल भरून अन्य ग्राहकांच्या समोर एक आदर्श निर्माण केल्यामुळे उप कार्यकारी अभियंता यांनी निसारअली  याचा शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.  उर्वरित बिल लवकरच भरणार असून इतर शेतकरी बंधूनाही बिल भरण्यास प्रोत्साहित करण्याचे  आश्वासन निसारअली यांनी दिले.  


मेळाव्यात आवाहन !
कृषी वीज बिल मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यास निसारअली उपस्थित होते. ग्राहकांना यावेळी कृषी धोरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले होते त्यावेळी निसारआली यांनी, 'आज दुपारीच बिल भरतो' असे सांगितले. त्यानंतर खरोखरच दुपारी ते कार्यालयात आले आणि १५ लाख २३ हजार ७० रुपयांची थकबाकी त्यांनी रोख आणि धनादेशाद्वारे भरली आणि थकबाकीमुक्त झाले. शेतकरी निसारअली यांनी एकरकमी एवढ्या मोठ्या रकमेचे वीज (Electricity bill) भरल्याने त्यांची चर्चा होऊ लागली आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !