शोध न्यूज : शिवप्रताप दिनाच्या प्रतापगडावरील सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छ. उदयनराजे अखेर अनुपस्थित राहिले आणि त्यांची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर खासदार छ. उदयनराजे भोसले हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी अत्यंत संतापाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि राज्यपाल हटावची मागणी देखील केली होती. पत्रकारांशी बोलताना त्यांचे डोळे देखील पाणावले होते. छ. शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर राज्यात राज्यपाल कोश्यारी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावरील संताप आक्रमकपणे समोर आला होता. राज्यपाल कोश्यारी यांनी या विधानांवर माफी मागितलीच नाही आणि त्यांना अद्याप हटवलेही गेले नाही.
दरम्यान आज प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा सोहळा साजरा होतोय पण या सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणारे खा. उदयनराजे उपस्थित राहिले नाहीत. या सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले होते अशी देखील माहिती समोर आली आहे. मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरीही उदयनराजे यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आज प्रतापगडावरील सोहळ्यास उपस्थित राहिले पण छ. उदयनराजे हे मात्र अनुपस्थितच राहिले आहेत.
रायगडावर ३ डिसेंबर रोजी आंदोलन होणार आहे, त्याची चर्चा आज ते आपल्या कार्यकर्त्यांशी करणार असल्यामुळे ते प्रतापगडावर उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील उदयनराजे यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करण्यात आले परंतु राजे साताऱ्यात असताना देखील आज उपस्थित राहिले नाहीत. (Udayanraje is upset! Absent from Shiv Pratap Day celebrations)याची आता जोरदार चर्चा सुरु झाली असून राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात शिवप्रताप दिनाचा सोहळा साजरा होता असताना उदयनराजे यांची अनुपस्थिती अनेकांना दु:ख देवून गेले आहे.
महाराष्ट्राचे अश्रू !
शिवरायांचे वंशज उदयनराजे यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी व्हायला हवी होती असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची ही चुप्पी असून प्रतापगडावर जाऊन शिवरायांना वंदन करण्याचा अधिकार त्यांना नाही, हे सगळे ढोंग आहे असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
दुपारी पत्रकार परिषद
राज्यपालांवर कुठलीची करावाई नसल्यामुळे उदयनराजे हे नाराज असल्याची चर्चा असतानाच राजे दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल यांच्या वक्तव्यावर अत्यंत आक्रमक शब्दात भाष्य केले होते त्यामुळे आज ते क्या सांगतात याची महाराष्ट्राला प्रतीक्षा लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !