BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० नोव्हें, २०२२

सरपंचांनीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले विष आणि --

 




शोध न्यूज : गावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंचानेच जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेतले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची एक अजब घटना घडली आहे.

 
गावाचा गाडा हाकण्याचे मोठे काम सरपंचांच्या खांद्यावर असते आणि गावाच्या भल्यासाठी अनेक सरपंच प्रशासनाशी भांडत असतात, कधी आंदोलने करतात तर कधी केवळ इशारा देवून आपले काम करून घेतात. सरपंच म्हणजे गावाचा पालक असतो पण अशा सरपंचाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी यांना या सरपंचाने लेखी पत्र देखील दिलेले आहे. सरपंच आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न यामुळे गावातील एखाद्या सार्वजनिक कामासाठी हा प्रकार झाला असेल असे कुणालाही वाटेल. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून आपले कुटुंब त्रास देतेय अशी तक्रार या सरपंच महोदयाची आहे. कुटुंब कशासाठी त्रास देतेय हे ऐकल्यावर कुणीही कपाळावर हात मारू घेईल. जिल्हाधिकारी यांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. 


श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि गावातील एक तरुण सरपंच झाला. आता सरपंच झाल्यावर त्याने गावातील समस्या, आपसातील तंटे यात लक्ष घालण्याची अपेक्षा होती. पण जे घडले ते अगदीच वेगळे होते. या नव्या दमाच्या सरपंचाचे गावातील एका विवाहीतेशी सुत जुळले. गावाच्या सरपंचाचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण सुरु झाले आणि गावात चर्चा सुरु झाली. मोडणारे संसार जुळवून देण्याचे काम सरपंच महोदयाने करण्याऐवजी त्याने एका विवाहीतेशीच प्रेमाचे संबंध जुळवले. विवाहित महिलेच्या पतीने आणि सरपंच महाशयाच्या कुटुंबीयांनी या प्रेमप्रकरणाला विरोध सुरु केला. हे प्रकरण बंद व्हावे म्हणून या विवाहित महिलेला तिच्या माहेरी पाठवून देण्यात आले.


प्रेम हे प्रकरण नेहमीच काहीतरी वेगळे रूप दाखवत असते. माहेरी पाठविलेल्या महिलेला माहेरी राहण्यात काही सुख मिळेना. आपल्याला माहेरी मारहाण होत असल्याची तक्रार तिने आपल्या पतीकडे नव्हे तर प्रेमी सरपंचाकडे केली. सरपंच महाशयाने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि तक्रार केली. ' आमचे प्रेम असून आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही, असे असताना आम्हाला त्रास दिला जात आहे, आम्हाला सोबत राहू दिले जात नाही' अशी त्यांची तक्रार होती. तसे एक पत्र देखील त्याने लिहिले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर जाऊन त्याने विष प्राशन केले. हा प्रकार पोलिसांच्या नजरेत आला आणि त्यांनी सरपंचाला लगेच रुग्णालयात दाखल केले. 


एका सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पसरली आणि एकच गोंधळ उडाला. (
Sarpanch attempted suicide by poisoning himself in the collector's office) सत्य परिस्थिती समजली तेंव्हा एकच चर्चा सुरु झाली. आता सरपंचाच्या या समस्येवर तोडगा कसा आणि कुणी काढायचा हा प्रश्न समोर उभा राहिला आहे.  


     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !