BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२२

पंढरीत राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तारांचा जोरदार निषेध !

 



पंढरपूर (विजय काळे)  : खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत संतापजनक शिवीगाळ करणाऱ्या शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाराष्ट्र पेटलेला असताना पंढरपूर येथेही चपला मारून जोरदार निषेध करण्यात आला आहे.  


शिंदे गटातील मंत्री सतत एकापेक्षा एक वादग्रस्त विधाने करीत असताना आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अत्यंत घाणेरडे, संतापजनक, अशोभनीय अपशब्द वापरले असून राज्यात याचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. अब्दुल सत्तार यांच्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली असून त्यांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यातून संताप व्यक्त होत आहे. एका महिला खासदारांच्याबद्धल बोलताना वाईट शब्दाचा उच्चार राज्याच्या मंत्र्यांकडून झाला याचा संताप राज्यातून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या वतीने तर आक्रमक निषेध होत आहेच पण सामान्य माणूस देखील सत्तार यांच्या या वक्तव्याने दुखावला आहे. पंढरीत देखील सत्तार यांचा निषेध करण्यात आला आहे. 


 पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर सत्तार यांच्या प्रतिमेस चपला मारून लाथा मारून सत्तार यांच्या विरूध घोषणा देत तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला...अब्दुल सत्तार यांचा  प्रतिकात्मक पुतळा पंढरपूर शहर राष्ट्रवादी कडून दहन करण्यात आला. यावेळी  "जर आमच्या सुप्रियाताईंची आणि महाराष्ट्रातील महिलांची जर माफी नाही मागीतली तर यापुढे या गद्दार मंत्री मंडळातील कुठल्याही मंत्र्यास  पंढरपूर शहरात पाऊल ठेवू देणार जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष संदीप मांडवे यांनी यावेळी दिला. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेवून तत्काळ त्यांना मंत्री पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी केली.  याप्रसंगी रणजीत पाटील,दिगंबर सुडके,गिरिष चाकोते,दत्तात्रय माने,स्वप्निल जगताप,सुरज पेंडाल, रशिद शेख,सचिन आदमिले, बापू शिंदे, कपिल कदम, नवनाथ मोरे, सुरज गंगेकर, विशाल सावंत यांचे सह महिला आघाडीच्या साधना राऊत, संगिता माने, सुंनदाताई उमाटे, अनिताताई पवार, कविता जाधव यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान राज्यभरातून अत्यंत आक्रमक पडसाद उमटू लागले असून महाराष्ट्र पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे. (Strong protest of Abdul Sattar by NCP in Pandharpur) राज्यभरातून सत्तार यांचा जोरदार निषेध होऊ लागला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !