BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२२

मंत्र्यांकडून खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ, राष्ट्रवादी संतापली !

 



       दगडफेक ! 

घोषणाबाजी  !!  



शोध न्यूज : शिंदे गटातील बेताल मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस संतापली असून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावरही खळखटयाक करण्यात आले आहे.  


शिवसेना फोडून शिंदे गटासोबत गेलेल्या काही आमदारांनी गेल्या काही काळात ताळतंत्र सोडले असल्याने वारंवार समोर येत आहे. कुणी अधिकाऱ्यांना मारण्याची भाषा करीत आहे तर कुणी 'चून चून के मारुंगा' असे म्हणत सत्तांध झाल्याने दाखवून देत आहे. कायदा करण्याची आणि सांभाळण्याची ज्यांची जबाबदारी आहे तेच कायदा गुंडाळून ठेवू लागले आहेत त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून राजकारणातील एक वेगळा गलिच्छपणा समोर येत आहे. यात काही मंत्री देखील आघाडीवर असून आता तर शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट कॅमेऱ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे याना शिवीगाळ करणारी भाषा वापरली आहे त्यामुळे राष्ट्रवादी तर खवळून उठलीच आहे पण सर्वसामान्य माणूस देखील अस्वस्थ झाला आहे. 


मंत्रीपदावर असतानाही एका खासदारांवर, विशेषतः महिला खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अत्यंत घाणेरड्या आणि संतापजनक शब्दांचा वापर मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार हे वारंवार वादग्रस्त विधाने करीत असताना आता त्यांनी थेट महिला असलेल्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अशोभनीय, निंदनीय शब्दांचा वापर केला असल्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी शर्मनाक शब्दाचा वापर केला. पन्नास खोके राज्यभर गाजत असताना याच खोक्यांच्या विषयावरून सत्तार यांनी हे अपशब्द वापरले आहेत.  अब्दुल सत्तार यांनी 'तुम्हाला खोके हवे आहेत का ?' अशी विचारणा केली होती त्यावर सुप्रिया सुळे यांनी ' तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करता आहात' असे म्हटले होते. यावरच पत्रकारांनी विचारले असता सत्तार यांचा तोल पुन्हा एकदा सुटला आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत असभ्य शब्द वापरले.  


सत्तार यांच्या या अपशब्दांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड संतापली असून राज्यातील सर्वसामान्य माणूस देखील घाणेरड्या राजकरणामुळे अस्वस्थ झाला आहे. सत्तार यांचा जोरदार निषेध सुरु असतानाच त्यांच्या  बंगल्याच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. (Minister Abdul Sattar abuses MP Supriya Sule) त्यांच्या संभाजीनगर  येथील घरावर देखील दगडफेक करण्यात आली आहे. सत्तार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले असून त्यांचा राजीनामा मागण्यात येत आहे. सत्तार यांनी माफी मागितली तरी ती नको आहे, अशा व्यक्तीने मंत्रीपदाचा राजीनामाच दिला पाहिजे अशी ठाम भूमिका राष्टवादीने घेतली आहे. सत्तार यांच्या पुतळ्यांचे दहन देखील राज्यात ठिकठिकाणी केले जात आहे. 


लायकी दाखवू !

सत्तेचा माज असलेल्या अब्दुल सत्तार नावाच्या वाह्यात व्यक्तीने सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या शब्दाबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करताना सत्तार यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा त्यांचे महाराष्ट्रात फिरणे कठीण करू. सत्तार यांना त्यांची लायकी दाखवून देऊ असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. 


लायकी आहे का ? 

सत्तार ज्या भाषेत सुप्रिया सुळे यांच्याबद्धल बोलले आहेत त्यावरून त्यांचे विचार किती घाणेरडे आहेत हे दिसून येते असे राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी म्हटले असून मंत्रीपदाची आपली लायकी आहे काय ?  मंत्री होण्याची पात्रता आहे काय ? असा सवाल ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. 


माजलेत बोके !

'खोके घेवून माजलेत बोके' अशा शब्दात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.  महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत, राज्यपालांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा" असे दिघे यांनी म्हटले आहे.


सत्तार नरमले ?

राज्यातून जोडे मारो सुरु झाले असून प्रचंड वादाला तोंड फुटल्याचे पाहताच मंत्री अब्दुल सत्तार काहीसे नरमले असल्याचे दिसत आहे. 'महिलांची माने दुखावली असतील तर मी माझा शब्द मागे घेतो, पन्नास खोके म्हणून बदनाम करण्याबाबत आपले उत्तर होते' असे सत्तार म्हणू लागले आहेत.  काही तासांपूर्वी "मी कुणाला घाबरत नाही. आम्हाला खोक्याची भाषा बोलतात त्यांच डोकं तपासाव लागेल. आम्हाला त्यांच्यासारखी सवय नाही. मी आताही बोलणार, नंतरही बोलणार आणि सभेतही बोलणार" असे सत्तार म्हणाले होते.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !