शोध न्यूज : एका महिलेचा पाठलाग केल्याच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विद्यमान सरपंचांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने माळशिरस तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गावातील समस्या सोडविण्याची आणि गावातील एकूण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी सरपंच, उप सरपंच आणि निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची असते. सरपंचाना तर गावाचे कारभारी मानले जाते आणि कुटुंबप्रमुखाच्या नात्याने सरपंच यांनी गावाचा कारभार करायचा असतो. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सरपंच नितीन माळी यांच्यावर मात्र महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला असून माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच माळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी श्रीनिवास महामुनी यांच्यावर देखील हा गुन्हा माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. महिलेचा पाठलाग करून लोणावळा येथील नर्सरीमध्ये ठेवण्याचे आश्वासन देत हा गुन्हा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सरपंच माळी यांनी सदर महिलेचा पाठलाग करून एकटीला गाठून लोणावळा येथे नर्सरीमध्ये घेवून जावून अश्लील भाष्य केले आणि विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद पिडीतेने पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५४ ड, ३४१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सरपंच नितीन माळी, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीनिवास महामुनी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sarpanch accused of chasing woman)सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही संशयित आरोपी हे नॉट रिचेबल झालेले आहेत परंतु माळशिरस तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडवून देणारी ही घटना ठरली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या दोन्ही संशयित आरोपींच्या शोधात आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !