BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२२

वारकरी बनून पोलिसांनी पकडले कार्तिकी यात्रेतील चोर !

 


शोध न्यूज : वारकरी बनून पोलिसांनी कार्तिकी यात्रेतील २६ चोरटे पकडण्यात यश मिळवले असून वारकऱ्यांचा वेष परिधान करून हे पोलीस कार्तिकी यात्रेत एकरूप झाले होते. 


पंढरीच्या वारीसाठी राज्य आणि बाहेरूनही मोठ्या भक्तिभावाने सज्जन दाखल होतात तसे त्यांच्यात मिसळत दुर्जन देखील वारीच्या गर्दीत सहभागी झालेले असतात. वारीला आलेल्या भाविकांच्या चोऱ्या करण्याच्या उद्देशाने वारीकाळात अनेक चोर पंढरीत प्रवेश करतात. भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि या गर्दीत चोरटेही सामील झालेले असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक काम असते. भाविकांच्या साहित्याची, पैशाची चोरी होण्याचे प्रकार यात्राकाळात घडत असतात. लाखोंच्या गर्दीत सगळेच सारखे दिसू लागतात त्यामुळे भाविक कोण आणि चोर कोण हे सहजासहजी लक्षात येत नाही. भाविकांच्या सुविधेसाठी काम करणारे पोलीस मात्र लगेच लक्षात येतात आणि चोरते सावध होतात. त्यामुळे पोलिसांनीही युक्ती करून वारकरी वेष परिधान करून या चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले आहे. 


भाविकांच्या गर्दीत भाविकांसारखेच कपडे परिधान करून भाविकांच्या गर्दीत एकरूप होत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी २६ चोरट्यांना रंगेहात पकडले आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन राबत असते. भाविकांची सुरक्षा ही देखील तितकीच महत्वाची असते. चोरापासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी पोलीस तैनात असतात. भाविकांच्या चोऱ्या रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वारकरी वेशातील पथक तैनात केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजी पारेकर, सुबोध जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वारकरी वेष परिधान केला आणि सामान्य वारकरी होऊन गर्दीत मिसळून गेले. त्यामुळे हे पोलीस आहेत याची ओळख पुसली गेली आणि चोरट्यांना त्यांचा पत्ता लागला नाही.


साध्या वेषातील या पोलीस पथकाच्या सोबत खबरी आणि पोलीस अंमलदारही होते. वारकरी बनून हे पोलीस गर्दीतील चोरट्यावर नजर ठेवून होते. गर्दीचा आणि कुणाचे लक्ष नसल्याचा फायदा घेत भाविकांच्या साहित्याला हात घालणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचं नेतृत्वाखालील ही पथके काम करीत होती. या पथकांनी चोरट्यांना अचूक हेरून २६ जणांच्या मुसक्या आवळल्या. साध्या वेषातील पोलिसांच्या पथकामुळे वारीतील चोरीवर नियंत्रण आले (The police caught the thief in Kartiki Wari in disguise) आणि भाविकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले त्यामुळे भाविकातून देखील पोलिसांना धन्यवाद देण्यात आले. 


४७ पाकीटमार ताब्यात !

यात्रेतील गर्दीचा फायदा उठवत खिसे कापणारे देखील आपली 'हात की सफाई' दाखवत असतात. अशा पाकीटमाराना हेरून पोलिसांनी ४७ पाकीटमाराना गर्दीतून ताब्यात घेतले. त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले आणि दोन दिवस त्यांना रोखून ठेवण्यात आले. यामुळे भाविकांचे खिसे कापण्याच्या घटना टाळल्या गेल्या. दोन दिवस थांबवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या जवळ एका भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली परंतु पोलिसांनी वेळीच हालचाल केली आणि सांगोला तालुक्यातील बिले वस्ती येथील स्वप्नील मारुती घुले याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता सदर साखळी मिळून आली.   

(By becoming Warkaris, the police have succeeded in catching  thieves in the Kartiki Yatra.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !