BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२२

सोलापूर जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम !




शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात विशेषत: पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात बिबट्याची दहशत पुन्हा वाढली असून माळशिरस तालुक्यातील फळवणी- अकलूज रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याचे समोर आले आहे. 


मागील काही काळापासून बिबट्या या कल्पनेने अनेकांच्या काळजाची धडकी भरत आहे. करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला ठार केल्यानंतर शेतकरी आणि नागरिक यांच्यातील भीती काहीशी कमी झाली होती पण पुन्हा पंढरपूर, मोहोळ तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सतत होत राहिली आणि शेतकरी भीतीच्या सावटात गेले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी आणि परिसरात तर बिबट्या सदृश प्राण्याने काही शिकारही केली आणि पावलांचे ठसे देखील आढळून आले. हे ठसे बिबट्याचे आहेत की अन्य वन्य प्राण्यांचे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिले. वन विभाग काही ठोस माहिती सार्वजनिक करील अशी आशा देखील कुचकामी ठरली. बिबट्या पाहिल्याचे सांगणारे लोक पुढे येत राहिले, मोबाईलमधून केलेले चित्रण व्हायरल होत राहिले आपण बिबट्या आहे की नाही याची निश्चित माहिती अद्यापही जनतेला मिळाली नाही. 


दरम्यान आता पुन्हा एकदा बिबट्या पहिला असल्याची माहिती समोर आली असून फळवणी - अकलूज रस्त्यावर बिबट्या पाहिल्याचे सांगणारे समोर आल्याने आणखी एकदा भीतीचे सावट गडद झाले आहे. पोलीस पाटील गणेश आवताडे यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या यंत्रणेवरून गावात बिबट्या आल्याची सूचना देत गावकऱ्यांना सावध केले आणि यामुळे बिबट्याची दहशत पुनः वाढली आहे. माळशिरस तालुक्याच्या वन परिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांनीही याला दुजोरा दिला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील संदीप शिंदे हे कारमधून महूदकडून अकलूजकडेनिघाले असताना कारच्या समोरून बिबट्या जाताना त्यांना दिसला आणि त्यांनी या घटनेचे आपाल्या मोबाईलमध्ये चित्रण देखील केले. दत्तात्रय पवार यांच्या दूध डेअरीच्या जवळ दिसलेल्या या बिबट्याने नारायण अवताडे यांच्या संकरीत गाईची आणि भटक्या कुत्र्याची शिकार देखील केली असल्याचे सांगितले जात आहे.


 या घटनेनंतर वन विभाग सतर्क झाला असून त्यांनी ठसे तसेच केलेल्या शिकारीची पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु सतर्क राहावे, आपली काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळेस फिरू नये, बाहेर पडताना घुंगरू असलेली काठी सोबत घ्यावी तसेच माबाईलवरून मोठ्या आवाजात गाणी सुरु ठेवावीत. (Leopard terror continues in Solapur district) रात्रीच्या वेळेस शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासल्यास एकटे जाण्यापेक्षा समूहाने जावे असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर दिसलेला प्राणी हा बिबट्याच आहे की पुन्हा एकदा बिबट्या सदृश्य प्राणी आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !