BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२२

पेपर वाचता वाचता हृदयविकाराचा अटॅक..... VDO




माणसाला मरण कधी आणि कुठे येईल हे सांगता येत नसले तरी मृत्यू कसा येऊ शकतो याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून 'न सांगता येतो त्यालाच मृत्यू म्हणतात' याची प्रचिती येवून जाते.


जन्म आणि मृत्यू हा कुणाच्या हातात नसतो, चालता बोलता जीव अचानक निघून जातो हे आपल्या आजूबाजूला सतत पाहायला आणि अनुभवायला मिळत असते. कुणी अपघातात जाते तर कुणी आजारात जाते. कित्येक मृत्यू तर असे असतात की सहज बोलता बोलता माणूस शांत होतो. अलीकडे हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याची कुणाला जाणीव होते तर कुणी झोपेतच मृत्युमुखी पडते. कुणी बसल्या बसल्याच डोळे झाकते. पूर्वीकाळी वय झाल्यावरच हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगितले जात होते पण आता अगदी तरुण वयात देखील अशा घटना घडताना दिसतात आणि त्यात तरुण देखील मृत्युमुखी पडतात.


व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर येवू लागल्या आहेत. चालता बोलता हृदयविकाराचा झटका येतो आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू देखील होतो. अशा घटना नेहमी ऐकायला मिळतात पण अशा घटना नेमक्या कशा घडतात याचे काही व्हिडीओ देखील अलीकडे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता आणखी एक असाच मृत्यूचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल होत असून मृत्यू कसा नकळत चोरपावलाने येतो हेच यातून दिसून येत आहे. मृत्यू येतो तेंव्हा तो क्षणाचाही वेळ आपल्याला देत नाही हेच या व्हिडीओमधून दिसून येत आहे. 


एक व्यक्ती शांतपणे एका कार्यालयात येते, तेथे बेंचवर बसते आणि बाजूला पडलेले वृत्तपत्र वाचायला घेते. वृत्तपत्र वाचता वाचता हृदयविकाराचा झटका येतो आणि ही व्यक्ती क्षणार्धात कोसळते. ना कसला आवाज, ना काही हालचाल ... एका क्षणात सगळे कसे शांत होते. ही व्यक्ती कोसळल्यानंतर आजूबाजूचे लोक धावत येतात. (Viral video: Cardiac arrest can lead to death)  नंतर या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात देखील नेण्यात येते पण तोपर्यंत सगळे काही शांत झालेले असते. या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टर सांगतात. असा मृत्यू कुणालाही कधीही येवू शकतो. तुम्हीही पहा हा व्हिडीओ ! 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !