BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२२

आई वडिलांच्या कुशीतून बिबट्याने मुलाला पळवले !

 





शोध न्यूज : आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्याने पळवून नेल्याने आता बिबट्याची दहशत अधिकच वाढू लागली असून ऊस तोड मजुरांना तर अधिक धोका निर्माण होऊ लागला आहे.

 
गेल्या काही काळात राज्यात विविध भागात बिबट्यांचा वावर अनुभवला जात आहे. शेतकरी बांधवांची जनावरे फस्त होत आहेत तसेच जागोजागी त्यांच्या पाउलखुणा देखील दिसत असतात. अनेकदा बिबट्याचे दर्शन होते तर कुणी त्याचे फोटो, व्हिडीओ घेवून व्हायरल करीत आहे. पुणे जिल्ह्यात घराच्या पाठीमागे गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला नुकतेच बिबट्याने ऊसात पळवून नेले आणि तिचा प्राणही घेतला. ऊस तोड कामगारांची मुले पळविण्याच्याही काही घटना यापूर्वी घडल्या असून आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक आणि चिंता वाढविणारी घटना घडली आहे. विशेष म्हणजे आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलाला पळविण्याचा प्रकार घडला आहे. 


कष्ट करून थकलेले उस तोड मजूर आपल्या कोपीत झोपलेले असताना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावाच्या शिवारात ही घटना घडली. ऊस तोड मजूर आपल्या मुलाला कुशीत घेवून कोपीत झोपलेले असताना तेथे एक बिबट्या आला. झोपलेल्या विरु अजय पवार या तीन वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलास आई वडिलांच्या कुशीतून उचलून बिबट्याने ऊसाच्या फडात पळवून नेले. अर्ध्या रात्री हा सर्व प्रकार घडत होता.  लक्ष्मीमाता मंदिराजवळ संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी जळगाववरून आलेल्या मजुरांच्या २० कुटुंबांच्या राहुट्या एकाच ठिकाणी आहेत. तेथे बिबट्याने प्रवेश केला आणि मुलाला पळवले. जबड्यात मुलाला पकडून बिबट्या निघाला असताना मुलगा जोराने ओरडला आणि त्यामुळे इतर लोक जागे झाले.

 
झोपेत असलेल्या आई वडिलांनी डोळे उघडताच त्यांना हा भयानक प्रकार आपल्या डोळ्यांनी पहायला मिळाला. विरूला मानेला पकडून बिबट्या तोपर्यंत शंभर दीडशे फुट अंतर पुढे गेलेला होता.  त्याच्या आई वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता अथवा कुणाच्या मदतीची वाट न पाहता बिबट्याचा पाठलाग सुरु केला. ऊस तोड कामगार असलेल्या आई वडिलांनी बिबट्यावर आक्रमण केले आणि लहानग्या मुलाची त्याच्या तावडीतून सुटका केली. विरूच्या मानेत बिबट्याचे दात खोलवर रुतले असून त्यातून रक्तस्त्राव होत राहिला. त्याच्या मानेला जखमा झाल्या असून त्याला तातडीने प्रवरा ग्रामीणरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्याने या मुलाची प्रकृती अधिक बिघडू लागल्याने त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  


बिबट्या एकट्या माणसाला पाहून चाल करतो याचे अनुभव आहेत पण आता तर झोपडीत येवून आई वडिलांच्या कुशीतून मुलाला उचलून नेऊ लागला आहे. या घटनेने ऊस तोड मजूर धास्तावले आहेत शिवाय शेतकरीही घाबरलेले आहेत. जिकडे तिकडे ऊसाचे पीक असल्यामुळे बिबट्याला आश्रय घेण्यास पुरेसी जागा मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांचे आस्तित्व जाणवत नाही त्यामुळे तर अधिकच चिंता व्यक्त होऊ लागली आहे. (A leopard entered the hut and hunted a small child) राज्याच्या विविध भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जात परंतु बिबट्यासदृश्य प्राणी म्हणून पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने वेळीच अलर्ट होण्याची गरज धास्तावलेले शेतकरी करू लागले आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !