BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२२

पंढरपूर तालुक्यात इंजेक्शन देवून शेतकऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न !

 


शोध न्यूज :  झोपलेल्या शेतकऱ्याला इंजेक्शन देवून खून करण्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असून या घटनेने भलतीच खळबळ उडवून दिली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून यासंदर्भात ज्ञानेश्वर चांगदेव मुळे यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर मुळे हे शेतकरी आपल्या शेतात गट क्र. १०४ मध्ये काम करीत होते. शेतीला पाणी देत असताना कंटाळून ते शेताच्या बांधाजवळ असलेल्या एका रस्त्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झोपले होते. अंगावर लुंगी घेवून ते जमीनीवर पडलेले असताना तेथेच त्यांना झोप लागली. ते झोपेत असतानाच त्यांच्या अंगावर कुणीतरी बसल्याची त्यांना जाणीव झाली. रात्रीची वेळ आणि शेताचा परिसर असताना अचानक अंगावर कुणी बसल्याची त्यांना जाणीव झाली त्यामुळे ते लगेच दचकून जागे झाले. काहीतरी वेगळा प्रकार होत असल्याची त्यांना जाणीव झाली. 


झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या पायावर कुणीतरी बसलेले होते तसेच हातावर देखील कुणी बसले असल्याचे त्यांना जाणवले. हा प्रकार पाहून ज्ञानेश्वर चांगदेव मुळे हे दचकून उठले. अचानक घडत असलेल्या या प्रकाराने ते गोंधळून गेले. त्यांनी डोळे उघडून पहिले तेंव्हा त्यांना वेगळाच प्रकार दिसला. दोघांनी त्यांचे हात आणि पाय पकडून ठेवले होते. चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्यामुळे या व्यक्ती कोण आहेत हे लक्षात येत नव्हते. या दोघांनी मुळे यांचे हातपाय पकडले होते तर आणखी एक व्यक्ती बाजूला उभा होता. त्याच्याही चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. घाबरून गेलेले मुळे स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. 


अचानक होत असलेला हा प्रकार काही गंभीर असल्याची जाणीव मुळे यांना झाली होती. त्यांनी 'मला सोडा, मला सोडा...' असा आरडाओरडा सुरु केला परंतु या व्यक्ती सोडत नव्हत्या. शेतात आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांच्या मदतीला धावणारेही आजूबाजूला कुणी नव्हते. बाजूला उभ्या असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने मुळे यांचे तोंड दाबले. "तुला आता जिवंत सोडत नाही, तू आता कसा पाळतो तेच बघतो"  असे म्हणत बालाजी शिवाजी कदम याने मुळे यांना जीवे ठार मारण्याच्या हेतूने इंजेक्शन दिले. मुळे यांच्या उजव्या पायाच्या मांडीत कसलेतरी इंजेक्शन दिले अशा प्रकारची फिर्याद मुळे यांनी दिली आहे.  


सदर प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात मुळे यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी जगतात हत्या करण्याचे विविध प्रकार अवलंबले जातात परंतु ग्रामीण भागात देखील इंजेक्शन देवून ठार मारण्याचा प्रकार घडल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 


फिर्यादी ज्ञानेश्वर चांगदेव मुळे यांना अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तारू हे करीत आहेत. (Attempt to murder farmer by injection in Pandharpur taluka)या घटनेमुळे करकंब परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हा एक चर्चेचाही विषय बनला आहे. इंजेक्शन देवून कुणाची हत्या करणे असे दृश्य चित्रपटातून पाहायला मिळते. असेच दृश्य पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे शिवारात प्रत्यक्षात घडले आहे. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !