शोध न्यूज : लाचखोरीत अडकलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार असून आज त्यांच्या जामिनावर निर्णय येण्याची शक्यता आहे तर त्यांचे निलंबन होण्यावर देखील आज निर्णय अपेक्षित आहे.
वादग्रस्त ठरलेल्या सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात ते सापडले असून त्यांना अटकही झाली आहे. त्यानंतर त्यांच्या अनेक सुरस कथा ऐकायला मिळू लागल्या असून त्यांच्या अमाप मालमत्तेचीही मोठी चर्चा होऊ लागली आहे. त्यांना अधिकची पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला असून आज सोमवारी त्यांच्या जामीनावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आज त्यांना जामीन मिळतोय की नाही ? याकडे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचेही लक्ष लागलेले आहे.
लाचखोरीत अडकल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. अद्याप त्यांना निलंबित करण्यात आलेले नसले तरी आज सोमवारी निलंबनाच्या प्रस्तावावर निर्णय येण्याची शक्यता आहे. लोहार यांच्या मालमत्तेबाबत देखील चौकशी होणार आहे, खुली चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठांकडे परवानगीची मागणी केली आहे. ही परवानगी मिळताच लोहार यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे. ही परवानगी कधी मिळतेय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजचा दिवस मात्र लोहारांसाठी महत्वाचा ठरणार आहे. न्यायालयाकडून त्यांना आज जामीन मिळतोय काय ? या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार असून निलंबनावरील निर्णय आज अपेक्षित आहे. एवढी मोठी कारवाई होऊनही अद्याप त्यांचे निलंबन न झाल्याने दबक्या आवाजात बरीच काही चर्चा सुरु झाली आहे तथापि नियम आणि कायद्यानुसार त्यांचे निलंबन होऊ शकते हे स्पष्ट आहे. लोहार यांच्या प्रकरणातून शिक्षण विभागात नक्की काय सुरु आहे हे समोर आलेच आहे परंतु या निमित्ताने अन्य काही मंडळींचेही धाबे दणाणले आहेत. लोहार यांच्या निमित्ताने अन्य काही दलालांचे बिंग फुटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
लाचखोरीच्या कारवाईपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात नेमके काय सुरु आहे याबाबत बरीच काही चर्चा होऊ लागली आहे. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय देखील गाजू लागला आहे. लोहार 'जात्यात' गेले असले तरी 'सुपात' असलेले अनेकजण हादरले असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. (A decision is expected regarding the suspension of education officer Lohar) त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी काय काय घडतेय याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
(Today will be a very important day for primary education officer Kiran Lohar, who is involved in bribery, and a decision on his bail is likely to be taken today and a decision on his suspension is also expected today.)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !