शोध न्यूज : अत्यंत सामान्य कारणावरून पंढरपूर तालुक्यात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीला उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे ही घटना घडल्याची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीसाकडे करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सचिन भालेराव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरकोली येथील सुधीर अशोक भालेराव यांनी याबाबत फिर्याद दिली असून कुलभूषण पोपट हाबळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सरकोली येथे अत्यंत किरकोळ कारणावरून हा हल्ला झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कुलभूषण हाबळे हे संभाजी भोसले, बळीराम भोसले यांच्यासह सुधीर भालेराव यांच्या घरी गिनीगोल गवताच्या संदर्भात चर्चा करीत बसले होते. याचा राग सचिन सुखदेव भालेराव याला आला होता आणि यातूनच सदर प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चर्चा करीत बसल्याचा राग मनात धरून नंतर कुलभूषण हाबळे हे गावातील विठ्ठल डेअरीच्या जवळ सचिन सुखदेव भालेराव याने जीवे ठार मारण्याच्या हेतूने पाठीमागून येवून कुलभूषण यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला. काठीचा जोराचा मार डोक्यात लागल्याने कुलभूषण हे गंभीररित्या जखमी होऊन खाली पडले.
काठीच्या प्रहाराने कुलभूषण हाबळे हे मार लागताच बेशुद्ध पडले त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी सुधीर अशोक भालेराव यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्धल सचिन भालेराव याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( Attempt to Murder one in Pandharpur taluka) कुलभूषण हाबळे हे सद्या सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !