BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ डिसें, २०२२

एकावेळी दोन मुलींशी लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल !



शोध न्यूज : एकाच मांडवात एकाच वेळी दोन मुलींशी लग्न करणे चांगलेच अंगलट आले असून अकलूज पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

 

गावोगावी लग्नाचे सोहळे होत असतात पण यातील काही लग्नसोहळे हे चर्चेचे ठरतात. कुठल्यातरी वेगळ्याच कारणांनी हे विवाह गाजत असतात आणि मग त्याची काही दिवस चर्चा होत असते. आपल्या लग्नाची चर्चा व्हावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मात्र एक विवाह असा काही झाला की त्याची चर्चा तर प्रचंड झालीच परंतु हा विवाह आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. उच्चशिक्षित असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी एकाच मांडवात एकाच मुलाशी लग्न केले आणि त्याची जिल्ह्यातच काय पण राज्यभर चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर हा विवाह तुफान चर्चेचा ठरला. एक नवरा आणि दोन नवरी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत राहिले आणि हीच चर्चा आता अडचणीची ठरू लागली आहे. 


माळशिरस तालुक्यातील महाळुंग परिसरात राहणाऱ्या अतुल उत्तम आवताडे या तरुणाने २ डिसेंबर रोजी अकलूजच्या जवळच असलेल्या  अकलूज - वेळापूर मार्गावरील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. हा विवाह मुलींच्या इच्छेनुसारच करण्यात आला होता. दोन्ही जुळ्या मुलीनी एकाच मुलाला पसंती दिली आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत या दोन मुलींचा विवाह एकाच मुलाशी, एकाच मंडपात झाला.  त्यामुळे चर्चा होणे तर स्वाभाविक होतेच पण या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ देखील बहुचर्चित झाले. सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. सगळीकडे याच लग्नाची चर्चा सुरु झालेली असताना माळेवाडी येथील राहुल फुले यांनी मात्र याबाबत अकलूज पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी लग्न बहुपत्नी कायद्याविरोधात असल्यानं नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


नवरदेव अतुल अवताडे हा मूळ माळशिरस तालुक्यातील महाळुंग यथील आहे परंतु त्यांच्या  ट्रॅव्हल्सचा व्यवसाय मुंबईत आहे. चांगल्या पगार मिळविणाऱ्या आणि आय टी इंजिनियर असलेल्या पिंकी आणि रिकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणी आहेत. दोघीही दिसायला एकसारख्या आहेत आणि त्यांची अखेरपर्यंत एकत्रच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्यभर एकत्र राहता यावे यासाठी त्यांनी एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाडगावकर कुटुंबानेही अशा लग्नास परवानगी दिली आणि अखेर असा विवाह २ डिसेंबर रोजी अकलूज - वेळापूर  मार्गावर असलेल्या एक मंगल कार्यालयात संपन्न झाला. 


या मुलींच्या पित्याचे निधन काही दिवसांपूर्वी झाले आणि या मुली आपल्या आईसोबत राहत होत्या. यावेळी आजारपणात अतुलने त्यांना खूप मदत केली. या मदतीतून त्यांची जवळीक वाढली आणि त्यातून हा विवाह जुळला गेला. (Marriage to two sisters at the same time, case file) मोठ्या थाटात हा विवाह साजरा झाला, विवाहाची चर्चाही झाली परंतु आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले असून नवरदेवाच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाविरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आला



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !