BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलणार !

 



सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली जाणार असून याबाबतशिक्षण समितीत ३ मार्च रोजी अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती जि. प. प्राथमिक  शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. 


हिवाळा संपून आता उन्हाळा सुरु झाला आहे आणि उन्हाची तीव्रता देखील वाढू लागली आहे. कोरोनामुळे कुलूपबंद राहिलेल्या शाळा आता सुरु झाल्या असून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यानीही समाधान व्यक्त केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात देखील शाळा सुरु ठेवण्याबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान उन्हाळयामुळे शाळांची वेळ बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यात सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात येते. आता मार्च महिना सुरु झाला असून उन्हाची तीव्रताही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. 


उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसू लागली आहे. काही पालकांनी तर आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांची अनुपस्थितीत वाढू नये तसे शाळेतील पटसंख्या कमी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जाणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभाग सभापती, समिती याबाबतचा निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडे दहा वाजता सुरु होणार आहे त्यामुळे माध्यमिक विभागांच्या पाचवी ते नववी वर्गांच्या वेळेचा निर्णय अद्याप झालेला दिसत नाही. माध्यमिक विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. 


कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या आणि याचा मोठा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला आहे.  कधी एकदा शाळा सुरु होतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर १ फेब्रुवारी पासून शाळा सुरु झाल्या आणि विद्यार्थी, पालक समाधानी झाले. महिन्याभरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत निघाली आणि यामुळे शाळेतील उपस्थिती कमी होताना दिसू लागली आहे. त्यामुळे शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या २ हजार ७९६ असून या शाळांत १ लाख ५० हजार ३४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !