BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२२

भारत- पाकिस्तान सामना पाहताना तरुणाचा मृत्यू !

 



शोध न्यूज : भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान झालेला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रोमहर्षक सामना पाहताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


क्रिकेट हा खेळ उत्सुकता आणि चढ उतार यांनी भरलेला असतो आणि त्यामुळे हा खेळ अन्य खेळापेक्षा अधिक लोकप्रिय झालेला आहे. क्रिकेटचे रसिक देशभरात आहेत पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा खेळापेक्षाही वेगळ्या भावनेने पहिला जातो. या सामन्यावेळी देशप्रेमाचे निखारे धगधगत असतात. चषक नाही मिळाला तरी चालेल पण या देशादरम्यान पराभव स्वीकारणे दोन्ही देशातील नागरिकांना मान्य नसते तसे खेळाडूही भारत - पाकिस्तान संघातील सामना एका युद्धाप्रमाणे खेळत असतात. कुठल्याही खेळ म्हटलं की एकाचा पराभव आणि एकाच विजय हे ठरलेले असते आणि त्यानंतर मात्र वेगवेगळ्या घटना समोर येतात.


भारतीय संघाकडून झालेला पराभव पाकिस्तानी नागरिकांना पचवता येत नाही हे यापूर्वी देखील दिसून आले आहे. घरातील टी. व्ही. संच फोडून टाकण्याचे अनेक प्रकार पाकिस्तानात घडलेले आहेत. यावर्षीचा टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत - पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. हा सामना अत्यंत थरारक आणि रोमहर्षक झाला त्यामुळे दोन्ही देशातील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका प्रत्येक चेंडूला चुकत होता. मैदानात आणि मैदानाबाहेर टी व्ही समोर बसलेले प्रेक्षक श्वास रोखून सामना पहात होते. कोणता संघ जिंकणार याचा काहीच अंदाज येत नव्हता. अखेरच्या टप्प्यात सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकू लागला त्यामुळे भारतीय प्रेक्षक अस्वस्थ झाले होते आणि अशा परिस्थितीत भारतीय संघाने हा विजय खेचून आणला. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना हा अटीतटीचा होत असला तरी रविवारी झालेला सामना हा इतर सामन्यापेक्षा निश्चितच वेगळा ठरलेला आहे .हा महामुकाबला प्रचंड थरारक झाला आणि भारतीय क्रिकेट रसिकांनी अभूतपूर्व जल्लोष केला. अखेरच्या चेंडूपर्यंत दोन्ही देशातील क्रिकेट प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत राहिली आणि या तणावातच एका भारतीय क्रिकेट रसिकाला हृदय विकाराचा झटका आला आणि दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू ओढवला असल्याचे समोर आले आहे. आसामच्या शिवसागर जिल्ह्यातील बिटू गोगोई हा तरुण भारत - पाकिस्तान यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी एका थिएटरमध्ये गेला होता. आपल्या मित्रासमवेत हा सामना पहात असताना आनंद घेता घेता त्याचा तणाव वाढत होता. 


तणाव वाढवणारा सामना पाहताना इतर प्रेक्षकाप्रमाणे त्याच्याही हृदयाची धडधड वाढत राहिली आणि अचानक बिटूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खुर्चीवरून खाली कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी लगेच त्याला रुग्णालयात पोहोचवले पण परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (
Youth dies while watching India-Pakistan cricket match) चित्रपटगृहात झालेल्या प्रचंड आवाजाच्या प्रदुषणामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचेही सांगण्यात येवू लागले आहे. ऐन दिवाळीत क्रिकेटचा आनंद घेताना आलेला त्याचा मृत्यू मात्र अनेकांना चटका लावून गेला आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !