BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२२

अंत्यसंस्कारासाठी चालवलेला तरुण तिरडीवरून उठून बसला !

 



शोध न्यूज : अंत्यसंस्कार करण्यासाठी घेवून जात असताना एक तरुण तिरडीवरून उठून बसल्याची आश्चर्यचकित करणारी एक घटना घडली असून या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


डॉक्टरनी मृत म्हणून घोषित केलेले अनेकजण जिवंत असल्याचे आढळून येते. अंत्याविधी करण्याच्या अखेरच्या क्षणी देखील अशा काही घटना घडल्या आहेत की, स्मशानातून पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात येते. अशा घटना घडल्या की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत असतो. मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचेही म्हटले जाते. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अंत्यसंस्कार करण्यासाठी चालवलेला तरुण चक्क तिरडीवरून उठून बसला. कुणाला हा धक्कादायक तर  कुणाला हा विचित्र प्रकार वाटू लागला आहे तर कुणी याला अंधश्रद्धेची जोड देताना दिसू लागला आहे. 


प्रशांत मेसरे या २१ वर्षे वयाच्या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे त्याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली. कुटुंबातील लोक, नातेवाईक आक्रोश करीत होते. अंत्यसंस्काराची सगळी तयारी पूर्ण करण्यात आली होती आणि त्याला तिरडीवरून स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते. तरुण वयात मृत्यू झाल्याने गावकरी देखील दु:खात होते आणि जड पावलाने ते तरुणाचा मृतदेह तिरडीवर ठेवून स्मशानाकडे निघाले होते. वाटेत मृतदेहाने काही हालचाल केल्याचे जाणवले. (The young man driven to the funeral came alive) सुरुवातीला हा प्रकार पाहिल्यावर भास होत असेल असे वाटून गेले पण नंतर त्याची हालचाल स्पष्टपणे जाणवली. अंत्ययात्रा थांबवली असता हा तरुण तिरडीवरून चक्क उठून बसला.   

 

हा प्रकार सर्वांनाच आश्चर्यकारक वाटला. गावकऱ्यांनी या तरुणाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. परिसरात या घटनेची माहिती गेली आणि गर्दी अधिकच वाढत गेली. ही गर्दी एवढी वाढली की पोलिसांना बोलाविण्याची गरज निर्माण झाली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून कुटुंबाने मात्र या तरुणावर काळी जादू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अत्यंत अजब घटना म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. तरुण वयात प्रशांत याचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला होता तर नातेवाईक प्रचंड दु:खात होते. त्याच्या मित्रांनी देखील 'मिस यु प्रशांत' असे स्टेटस ठेवले होते. एखाद्या काल्पनिक कथेत अथवा चित्रपटातील दृश्यात घडू शकते असा प्रकार प्रत्यक्षात घडला आणि लोक फक्त पहात राहिले.  


(A surprising incident took place when a young man sat up from his turban while being taken for burial)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !