BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२२

अमानुष ! जमिनीच्या वादातून बालकाची केली हत्या !



शोध न्यूज : विकलेली जमीन परत देण्यासाठी झालेल्या वादातून अवघ्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर  ट्रॅक्टर घालून त्याचा खून करण्यात आल्याची अत्यंत अमानुष आणि निर्दयी घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे.


संपत्तीसाठी माणूस कुठल्याही ठरला जाताना दिसत असून एकमेकांच्या जीवावर तर उठतोच आहे पण केवळ चार वर्षाच्या मुलाचा जीव घ्यायलाही तो मागे पुढे पहात नसल्याचे समोर आले आहे. चार वर्षाच्या मुलाला अजून व्यवहार आणि संपत्ती याची कसली जाणीवही झालेली नसताना त्याचा नाहक बळी घेण्याचा अमानुष प्रकार घडला असून मानवतेला कलंक लावणारी ही घटना मानली जात आहे. बांधकरी आणि शेजारी शेतकरी यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद होत असतात तसे सख्ख्या भावाशी देखील जमिनीवरून संघर्ष सुरु असतो . हा वाद कुठल्याही ठरला जातो परंतु केवळ चार वर्षाच्या मुलाचा काहीही संबध नसताना त्याचा जीव घेण्याची अत्यंत दु:खद घटना घडली आहे. 


विकलेली जमीन परत मागणे हा काही व्यवहाराचा भाग होत नाही तरीही त्यातून वाद झाला आणि या वादातून अंगणात खेळत असलेल्या चार वर्षे वयाच्या बालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला मारण्यात आले. इंदापूर तालूक्यातील सरडेवाडी येथे हा अमानुष प्रकार घडला आहे. मजुरी करून उपजीविका करणाऱ्या जब्बार शेख यांनी दोन वर्षांपूर्वी जयप्रकाश देवकाते यांच्याकडून चार आर जमीन नोटरी करून विकत घेतली होती. गेल्याच वर्षी शेख यांचे कुटुंब शेतात राहण्यासाठी गेले होते. जमीन विकल्यानंतर देवकाते यांचा विचार बदलला आणि ते विकलेली जमीन पुन्हा परत मागू लागले. त्यासाठी ते जब्बार शेख यांना वारंवार धमक्या देत राहिले. अखेर जब्बार ही जमीन परत देण्यासही तयार झाले. दिलेले पैसे परत करा आणि जमीन परत घ्या असे जब्बार शेख यांनी देवकाते यांना सांगितले होते.


विकलेली जमीन परत मागणारा देवकाते घेतलेले पैसे परत द्यायला मात्र तयार नव्हता. जमिनीची घेतलेली किंम्मत परत न देताच त्याला जमीन हवी होती. फुकट जमीन देत नाही म्हणून देवकाते चिडलेला होता. अखेर त्याने नको तो विचार केला. जब्बार हे घरात चहा पीत बसले असताना त्यांचा चार वर्षे वयाचा मुलगा अबुजर शेख हा पडवीत चहा, बटर खात बसला होता. याच वेळी जयप्रकाश देवकाते हा  ट्रॅक्टर घेवून अंगणात आला आणि त्याने सरळ चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. आवाजाने शेख कुटुंब घराच्या बाहेर आले तेंव्हा त्यांना हे भयानक चित्र पाहायला मिळाले. चार वर्षे वयाच्या मुलाला चिरडून देवकाते हा  ट्रॅक्टर घेवून तेथून पसार झाला.  मोकळ्या शेतात ट्रॅक्टर उभा करून तेथून त्याने पळ काढला. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 


जमिनीच्या वादातून चार वर्षाच्या बालकाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हळहळला असून अनेकांना या अमानवी कृत्याने धक्का बसला आहे. (Inhuman! A child was killed due to a land dispute) अत्यंत क्रूर कृत्याने परिसर हादरला असून जब्बार गफूर शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जयप्रकाश नरहरी देवकाते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अनेकांची मने सुन्न झाली आहेत. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !