BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑक्टो, २०२२

चंद्रभागेच्या पात्रात बुडून होडीचालक तरुणाचा मृत्यू !


चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना 



शोध न्यूज : भीमा नदी दुथडी भरून वाहात असतानाच आज पंढरीच्या चंद्रभागेत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 


यावर्षीच्या पावसाळ्यात सतत चंद्रभागेत पाणी आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सतत धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे भीमा नदीची पातळी वाढलेली असते. धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीला पूर येत आहे आणि या पुरामुळे काही दुर्घटना या पावसाळ्यात घडल्या आहेत. तीन तरुणांचा पुरात वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भीमा नदी दुथडी भरून वाहात आहे. प्रशासनाने सतत सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या असतानाही काही घटना घडल्या असून आज पुन्हा चंद्रभागेच्या पात्रात अशीच एक दुर्दैवी घटना दिसून आली आहे.

 

चंद्रभागेच्या पात्रात पाण्यावर तरंगत असलेला एक मृतदेह काहीना दिसला. त्यामुळे तातडीने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह सरळ करून पहिल्यानंतर लगेच त्याची ओळख पटली असून हा मृतदेह पंढरपूर येथील सुनील उत्तम परचंडे या ३० वर्षीय तरुणाचा असल्याचे दिसून आले. तरुणाची ओळख पटल्यानंतर मात्र काही प्रश्न उपस्थित होऊ लागले. सुनील परचंडे हा तरुण होडीचालक असून त्याला उत्तम प्रकारे पोहता येत होते. तरीही तो या पाण्यात कसा आणि कधी पडला ? पाण्यात बुडून त्याचा मृत्यू कसा झाला ? असे  काही प्रश्न उपस्थित होऊ लागले. 


नदीतच होडी चालविणारा सुनील नदीत पडून मृत्युमुखी पडल्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. याप्रकरणी अधिक खुलासा पोलीस तपासात होईलच परंतु कोळी बांधवात या घटनेने शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. सुनील याला फीट येण्याचा त्रास होता अशीही चर्चा सुरु होती. (Young boatman dies after drowning in Chandrabhaga river) त्यामुळे उत्तम पोहता येत असले तरी त्याचा नदीत बुडून अंत झाला असावा असा कयास लावला जात आहे.   



   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !