BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑक्टो, २०२२

ऊसाचे टिपरु बेतले बालकाच्या जिवावर, झाला जागेवर मृत्यू !

 



शोध न्यूज : ऊसाच्या एका तुकड्यासाठी बालकाला आपला जीव गमावण्याची वेळ आली असून गावागावात लहान  मुले अशाच प्रकारे आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. 


साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले की सगळ्याच रस्त्यावर उसाची वाहतूक सुरु असते. दरवर्षी या कालावधीत अपघाताचे प्रमाण वाढलेले असते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अत्यंत बेपर्वाईने धावत असतात आणि उभे असले तरी कुठेही कसेही उभे केले जातात. कर्णकर्कश गाणी लाऊन हे ट्रॅक्टरचालक आपल्याच मस्तीत असतात आणि रस्त्यावरील निरपराध लोकांचा जीव घेत असतात. प्रत्येक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गळीत हंगामाच्या कालावधीत ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात होतात. रिफ्लेक्टर न लावता रात्री अपरात्री रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर आदळून अनेक दुचाकीस्वार आपला जीव गमावताना दिसतात. या बरोबरच धावत्या वाहनातील ऊस काढण्याच्या नादात मृत्यूला देखील आमंत्रण दिले जाते. 


पर्यायी रस्ते असतानाही उसाचे ट्रॅक्टर लोकवसाहतीतून धावत असतात. ऊसाची ट्रॉली दिसली की अनेक तरुण आणि लहान मुले धावत्या वाहनातील ऊस काढण्याचा प्रयत्न करतात. धावत्या वाहनावर चढून ऊस काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एखादा तुकडाच हाती लागतो पण या दरम्यान अपघाताची अधिक शक्यता असते. धावत्या ट्रॅक्टरच्या समोरून येणारे वाहन दिसत नाहीत आणि ऊस काढून उडी मारण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वाहनाखाली सापडले जाण्याची अधिक शक्यता असते . सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे अशीच दुर्दैवी घटना घडली असून उसाच्या एका तुकड्यासाठी एक सात वर्षे वयाच्या बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. 


कवठे महांकाळ येथे आंबेडकर नगरातून ऊस घेऊन निघालेल्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस काढू पाहणाऱ्या स्वप्नील वाघमारे या ७ वर्षे वयाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. धावत्या ट्रॅक्टरमधून ऊसाचा एक तुकडा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेला स्वप्नील थेट चाकाखाली गेला आणि थेथेच त्याचा मृत्यू झाला. उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेला हा ट्रॅक्टर ऊस घेऊन कर्नाटककडे निघाला होता. स्वप्नील याला ऊस पाहून तो खाण्याचा मोह झाला आणि तो धावत्या ट्रॅक्टरवर चढला. दोन ट्रॉलीच्या मधल्या हुकावर चालून तो ऊस काढू लागला. ऊस खेचत असतानाच ट्रॅक्टर गतिरोधकावर आदळला. त्यामुळे त्याचा हात सुटला आणि तोलही गेला, तो वरून पडला आणि थेट ट्रॉलीच्या टायरखाली गेला. 


उसाच्या एका तुकड्यासाठी धावलेल्या स्वप्नील वाघमारे या शाळकरी मुलाच्या अंगावरून उसाने भरलेली ट्रॉली गेली आणि स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. (Accidental death of child while pulling sugarcane from tractor) ऊसाचे एक टिपरू त्याच्या जीवावर बेतले असून असा ऊस काढण्याचा प्रकार गावोगावी होत असतो, त्या सर्वानी या घटनेकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !