BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑक्टो, २०२२

अन्नदात्याच्या अंत्यविधीला शोकाकूल माकडाची हजेरी ! हृदयद्रावक व्हिडीओ


शोध न्यूज : सोशल मीडियावरून अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात पण एका घटनेचा व्हिडीओ कुणाचेही डोळे ओले करणारा ठरला असून हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहिला जात आहे.  


हल्ली माणसापासून माणूस दुरावत चालल्याचे दिसत आहे पण मुके प्राणी किती बोलके असतात याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. प्रत्येक जिवाला भावना चिकटलेल्या असतात. आनंद, दु:ख याची जाणीव होत असते आणि त्यानुसार त्याच्या हालचाली आणि अन्य क्रिया होत असतात. आपल्या मालकावर संकट आले की पाळीव प्राण्यांना त्याची जाणीव होते आणि ते या संकटात मदतीला धावते. मुक्या प्राण्याला लळा लावला की ते माणसांपेक्षा अधिक प्रेम करताना अबुभवाला येत असते. पाळलेल्या कुत्र्याला कितीही दूर आणि अज्ञात ठिकाणी नेऊन सोडून दिले तर ते घरी पोहोचते. गाव, घर याचा कसलाही पत्ता त्याच्याजवळ नसतो तरीही ते अज्ञात ठिकाणावरून देखील बरोबर आपल्या घरी येते याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. पण केवळ खायला अन्न दिल्याची जाणीव एका माकडाने ठेवल्याचे पाहून कुणाच्याही डोळ्यातून अश्रू येतात असा एक व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे. 


माकडाला माणसांचे पूर्वज मानले जाते आणि आजही माणूस आणि माकड यांच्यात विलक्षण साम्य आहे. भावनेच्या बाबतीत तर ते माणसांच्याही पुढे आहे. हल्ली कुणाचे निधन झाले तर माणूस त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्याचे टाळतो. एका माकडाने मात्र वेगळीच माणुसकी जपली असून त्याचे कृत्य पाहून शब्द देखील निशब्द होतात. माकडाला अन्न खायला दिलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अशा दु:खाच्या प्रसंगी हे माकड या व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित झाले. हे माकड केवळ हजेरीपुरते येथे आले नाही तर त्याने मृतदेहाजवळ येवून आपला शोक देखील व्यक्त केला आहे. जवळ बसून त्याने मृत झालेल्या व्यक्तीला उठविण्याचा प्रयत्न देखील केला. घटनेची जाणीव झाल्यावर त्याला देखील दु:ख झाले असल्याचे त्याच्या एकूण हालचालीवरून दिसत राहिले. 

मृताच्या कुटुंबियांना झाले तसेच दु:ख या माकडाला देखील झाले असल्याचे स्पष्टपणे या व्हिडीओतून दिसत आहे. मृत झालेल्या व्यक्तीजवळ बसून हे माकड काही काळ एकटक पहात राहिले. माणसांची गर्दी असतानाही ते कुणाला बिचकले नाही की नेहमीच्या माकडचेष्टाही त्याने केल्या नाहीत. एखादा सभ्य माणूस मृतदेहाजवळ बसून रहावा अशा पद्धतीने हे माकड जवळ बसून होते. त्याच्याकडे पाहून मृताच्या कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाले. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या एकाने या घटनेचे चित्रीकरण केले आहे. आपल्याला रोज खाऊ घालणारी, आपली काळजी घेणारी व्यक्ती निपचित पडल्याचे या माकडाला देखील सहन झाले नसल्याचे या व्हिडीओत ठळकपणे दिसून येत आहे. 

माणसांपेक्षाही प्राणी किती इमानदार, जाणीव जपणारे असतात हेच यातून दिसून येत आहे. यापूर्वीही माकडाने दाखविलेल्या माणुसकीच्या काही घटना समोर आल्या आहेत पण ही घटना पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत. (A mourning monkey attends the funeral of the breadwinner : viral video)  माणसावर उपकार केले तर माणूस गद्दारी करू शकतो पण प्राण्यावर केलेले प्रेम तो कायम जपून ठेवतो हे अनेक प्राण्यांच्या बाबतीत अनुभवाला आले आहे. तुम्हीही पहा हा व्हिडीओ !    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !