BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२१

कार्तिकी वारीसंदर्भात दोन दिवसांत सकारात्मक निर्णय !

 






पंढरपूर : दिवाळीचा उत्साह वाढलेला असला तरी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारीचे वेध लागलेले असून यात्रेबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाणा असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे. 

कोरोनाच्या आक्रमणामुळे मागील वर्षांपासून पंढरीची वारी नेहमीसारखी होत नाही. आषाढी, कार्तिकी एकादशीला पंढरीत नसणे हे राज्यातील वारकरी आणि भाविकांना मान्यच होत नाही पण कोरोनामुळे सगळ्यांचाच नाईलाज झाला होता. केवळ प्रतीकात्मक वारी साजरी करण्यात आल्या होत्या. यावेळी मात्र कोरोनाचे संकट परतीच्या मार्गावर असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. राज्यातील बाकीचे व्यवहार सुरळीत झाले आहेत त्यामुळे कार्तिकी वारीसाठी परवानगी मिळेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. त्यात प्रशासनचाच्या त्याच दृष्टीने हालचाली सुरु असल्याने भाविकांना आनंद देणारा निर्णय येण्याची अधिक शक्यता आहे. 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारीसंदर्भात जिल्हाधिकारी याना प्रस्ताव सादर केलेला आहे शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडूनही अभिप्राय प्राप्त झाला आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात वारीबाबत सकारात्मक निर्णय घेणार आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटींच्या अधीन राहून वारीसाठी परवानगी देण्यात यावी असाच प्रस्ताव मंदिर समितीने सादर केलेला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन येथे एक बैठकही संपन्न झाली. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. 

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव विचारात घेता आणि वारीची परंपरा अबाधित ठेवत नागरिकांच्याची आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेतला जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर फवारणी करणे वाळवंट तसेच पासष्ठ एकर परिसरातील स्वच्छता आणि अन्य सुविधा याबाबतचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्याना आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या आहेत. जिल्हाधिकारी येत्या एक दोन दिवसातच कार्तिकी वारीसंदर्भात आदेश देणार आहेत. 

एकंदर परिस्थितीत पाहता कार्तिकी वरील परवानगी मिळण्याची अधिक शक्यता आहेच पण हा आदेश पारित करतांना कोणकोणत्या अटी असतील याचीच प्रतीक्षा आहे. वारीस मान्यता देण्यात आली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी काही अटी आणि शर्थीवरच कार्तिकी यात्रेस परवानगी देतील हे उघड आहे. भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिक यांनाही आता जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाची प्रतीक्षा आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !