BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑक्टो, २०२२

पंढरपूर बस स्थानकावरून तीन लाखांचे दागिने लंपास !

 


शोध न्यूज : पंढरपूर येथील बस स्थानकावरून एका महिलेचे तीन लाखांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला असून बस स्थानकावर प्रवाशांना असुरक्षित वाटू लागले आहे.


पंढरपूर बस स्थानकावर प्रवाशांच्या साहित्याची, दागिन्यांची चोरी होणे हा काही नवा प्रकार नाही. अधूनमधून प्रवाशांची चोरी होतच असते. विशेषत: महिलांची पर्स चोरण्याकडे चोरट्यांचा अधिक कल दिसत आहे. बसमध्ये प्रवासी चढत असताना दरवाजाजवळ गर्दी होती आणि प्रत्येकजण जागा मिळविण्यासाठी एस टी त घुसण्याचा प्रयत्न करीत असतो. याच दरम्यान चोरटे या गर्दीत घुसतात आणि चोरी करून पसार होतात. स्थानकावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याचा थांगपत्ता लागत नाही. श्रीपूर येथून आलेल्या एका महिलेच्या दागिन्यांची पर्स अशाच प्रकारे चोरट्यांनी लांबवली असल्याची घटना समोर आली आहे आणि पुन्हा एकदा प्रवाशात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


सुट्टी निमित्त श्रीपूर येथून बीडला निघालेल्या शिल्पा दत्तात्रय घुले यांची दागिन्यांची पर्स बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. चिपळूण - परळी या बसमधून घुले कुटुंब बीडला गावी निघालेले होते. या दरम्यान चोरीची ही घटना घडली. चोरीस गेलेल्या पर्समध्ये जवळपास दहा तोळे सोन्याचे दागिने होते. चार टोळ्यांचे सोन्याचे गंठण तसेच झुंबर, बोरमाळ, अंगठ्या, बदाम यासह अन्य काही दागिने होते. ते सगळेच दागिने चोरीला गेले असून याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (
Woman's jewelery stolen from Pandharpur bus station) एकूण ३ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बस स्थानकावर पुन्हा एकदा चोरी झाली असल्याने स्थानकावर पोलिसांना अलर्ट ठेवण्यात यावे अशी मागणी प्रवाशातून होत आहे. चोरीच्या अशा घटना घडत असल्यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !