BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑक्टो, २०२२

सणासुदीच्या दिवसात दोन तरुणांच्या आत्महत्या !



शोध न्यूज : घराघरात दिवाळीची लगबग सुरु असताना दिव्यांच्या उत्सवातच दोन तरुणांनी आपल्या हातांनी आपल्या प्राणाची ज्योत विझवली असल्याची दुर्दैवी घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.


दिवाळीच्या सणानिमित्त सगळीकडे आनंदी वातावरण आहे. प्रकाशाचा सण साजरा होत असून घरांच्या अंगणात दिवे पेटले असून घरे प्रकाशाने उजळून निघताना दिसत आहेत आणि दुसरीकडे मात्र निराशेच्या अंधारात चाचपडत असलेल्या दोन तरुणांनी आपल्या प्राणाची ज्योत ऐन सणासुदीच्या दिवसात विझवून टाकली आहे. मंगळवेढा तालुक्यात ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन तरुणांच्या आत्महत्या झाल्या असून या घटनेने अनेकांच्या मनाला चटका लावला आहे. मंगळवेढा तालुक्यातील खुपसुंगी आणि मुढवी या दोन गावावर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. दोन्ही आत्महत्येच्या घटना या गळफास लावून घडल्या आहेत.  


मुढवी येथील वैजिनाथ अंबादास रोकडे या ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीने दारूच्या नशेत असताना गळफास लावून आत्महत्या केली आहे. राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने गावकरी मंडळीत धक्का बसला आहे. मंगळवेढा तालुक्यातच अशीच दुसरी एक घटना घडली आहे. खुपसंगी येथे एका २१ वर्षांच्या तरुणाने देखील आपले आयुष्य संपवले आहे. शेतात बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून तेजस रामचंद्र लवटे याने ही आत्महत्या केली आहे. 


सदर दोन्ही घटनांची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनांबाबत पोलीस तपास करीत आहेत. (Suicide of two young people during the festive season) सणावाराच्या आनंदाच्या काळात या घटना घडल्याने दोन्ही कुटुंबात शोकाचे वातावरण आहे तर गावकरी देखील शोकाकूल झाले आहेत. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !