BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑक्टो, २०२२

भाजपच्या मंत्र्यांनी सामान्य महिलेच्या कानाखाली वाजवली !

 



शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यांनी भेटायला आलेल्या सामान्य महिलेच्या कानाखाली लगावली असून या घटनेचा व्हिडीओ देशभर व्हायरल होऊ लागला आहे. 

सत्ता आणि माज या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात याचे प्रत्यंतर अनेकदा पाहायला मिळते. काही राजकीय व्यक्तींना सत्तेवर आलो म्हणजे जगाचे मालक झालो असे वाटू लागते आणि मग त्यांचा व्यवहारही उन्मत्त होतो. 'जनतेची सेवा करायची असल्याने आम्हाला मते द्या' अशी कळकळीची विनंती करणारे काही जण निवडून आल्यावर त्याच जनतेचे मालक बनतात आणि अत्यंत हीन दर्जाची वागणूक जनतेला देतात. कायदे बनविणारे लोकप्रतिनिधी बिनधास्त कायदे मोडताना दिसतात. महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात शिंदे गटातील काही मंत्र्यांनी अशाच प्रकारची केलेली विधाने राज्यभर चर्चेची ठरली आहेत. सत्ता आल्यानंतर जनतेच्या समस्यांचे भान काहीना उरत नाही हे देखील दिसून येत असते, अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्री महोदयाने एका महिलेच्या कानशिलात लगावली असल्याचा व्हिडीओ खूप काही बोलून जात आहे. 


सगळ्याच राजकीय पक्षात कमी अधिक अशी मंडळी असतात. भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी सुसंकृत म्हणून गणला जात होता. अत्यंत संयमी विधाने आणि योग्य भाषेत टीका करणारे नेते या पक्षात होते त्यामुळे पक्षाची प्रतिमा देखील उंचावलेली होती. आता याच पक्षातील काही नेत्यांनी ही संस्कृती नष्ट करून टाकलेली आहे. महाराष्ट्रात देखील असे काही नेते आहेत की त्यांचे एकही विधान ऐकायला कान तयार नसतात. कर्नाटकातील पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमन्ना यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी थेट एका सामान्य महिलेच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ देशभर व्हायरल होत असून सामान्य जनतेतून या प्रकारचा निषेध केला जाऊ लागला आहे.


मंत्री महोदय व्ही. सोमना हे चामराज नगर जिल्ह्यातील हंगला गावाच्या दौऱ्यावर होते. यावेळी गावकरी आपल्या समस्या मंत्री महोदयांना सांगत होते. मंत्री देखील या समस्या ऐकून घेत होते. यावेळी एका सामान्य महिलेने आपलीही काही समस्या सांगितली. या महिलेकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले तेंव्हा आपले ऐकून घ्यावे यासाठी या महिलेने आग्रह केला. याचा राग मंत्रीमहोदयाला आला आणि त्यांनी कसलाही विचार न करता महिलेच्या कानशिलात लगावली. ती महिला आहे याचाही विचार त्यांनी केला नाही. महिलांचा आदर करावा एवढे देखील तारतम्य भाजपच्या या मंत्री महोदयांनी ठेवले नाही. 


मंत्र्यांनी कानशिलात लगावल्यावर देखील ती महिला या मंत्र्यांच्या पाया पडत असल्याचे दिसत आहे. मंत्री महोदयांच्या या प्रकारचे चित्रण झाल्याने ही घटना अनेकांना पाहायला मिळत असून कॉंग्रेस पक्षाने निषेध केला आहे. (BJP ministers slapped common women) सत्तेच्या नशेत भाजपच्या मंत्र्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना अरेरावी केली जात आहे अशी टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात येऊ लागली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !