BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑक्टो, २०२२

ढाब्यावर जाताय ..? न्यायालयाने ठोठावला मोठा दंड !

 .


शोध न्यूज : ढाब्यांवर मद्यपान करीत बसलेल्या तळीरामाना कायद्याचा मोठा दणका बसला असून चालकाला पंचवीस हजारांचा तर तळीरामान पाच हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. 


बहुतेक ढाब्यांवर बेकायदेशीर असले तरी खुले आम दारू उपलब्ध असते आणि ग्राहक देखील मौजमज्जा करीत बसलेले असतात. ढाब्यांवर विनापरवाना दारू विकण्यास कायद्याने मनाई आहे परंतु अनेक ढाब्यांवर खुलेआम आणि अवाजवी दरात दारू विकली जाते. अशा ठिकाणी बसून दारू पिण्यास देखील कायद्याने मनाई असली तरी बहुतेक ढाबे रात्री उशिरापर्यंत या मंडळीनी हाउसफुल्ल केलेले असतात. काही ढाबे तर एवढ्यासाठी उघडलेले असतात. 'येथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे' असा फलक दिसतो आणि तेथेच दारूची मुक्तपणे खरेदी विक्री सुरु असते. खरोखरच दारू पिण्यास मनाई करणारे बोटावर मोजण्याएवढेच ढाबे आहेत, बाकी ठिकाणी सगळे काही खुले आम सुरु असते. 


बहुसंख्य ढाब्यावर असे प्रकार उघडपणे सुरु असले तरी पोलीसाना म्हणे याची माहिती मिळालेली नसते आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईबाबत तर 'आनंदी आनंद' असतो. ढाब्यांवरची परिस्थिती पाहिली तर कायद्याची किती अंमलबजावणी होत असते हे उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराच्या परिसरात मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले आस्तित्व दाखवत हॉटेल चालक आणि तळीराम ग्राहक यांना चांगलाच दणका दिला आहे. बार्शी शहर परिसरातील 'हॉटेल सांज' आणि 'हॉटेल राजमुद्रा' येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला तेंव्हा तेथे दारू विकली जात असल्याचे आणि तेथे बसून पिण्यात येत असल्याचे दिसून आले.  राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत चालकासह ग्राहाकानाही कायद्याचा फटका दिला. 


या दोन्ही हॉटेलवर कारवाई करीत हॉटेलच्या चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाच पण या ठिकाणी अवैधरीत्या दारू पीत बसलेल्या सहा जणांविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली. हॉटेल चालक आणि मद्यपान करणाऱ्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तेथून २ हजार २८० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, ग्लास आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. केवळ एक दिवसात त्यांच्या विरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आणि न्यायालयाने देखील तत्काळ निकाल देत आरोपींना दंड ठोठावला आहे.  


आपले कुणीच काही करू शकत नाही असा गैसमज काही हॉटेल चालकांचा असतो परंतु येथे मात्र कायदा काय असतो याची अनुभूती या हॉटेल चालकांना आली आहे. न्यायालयाने दोन्ही हॉटेल चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. (Unlicensed Liquor: Hotel owners, customers Fined by court) हा हॉटेलमध्ये बसून विनापरवाना मद्यप्राशन करीत असलेल्या सहा ग्राहकांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 


परवाना आवश्यकच !
मद्यपान करणारे तसेच वाईन शॉप मधून मद्य खरेदी करणारे यांच्याकडे परवाना असणे आवश्यकच आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हा परवाना केवळ शंभर रुपयात एक वर्षांसाठी मिळतो तर एक हजार रुपयात लाईफ टाईम परवाना घेता येतो. दुकानातून दारू खरेदी करताना असा परवाना आवश्यक आहेच अन्यथा कारवाई होऊ शकते. परमीट रुम शिवाय अन्य ठिकाणी बसून दारू पिणे हा गुन्हा तर आहेच पण परवाना असणे देखील तितकेच आवश्यक आहे. दिवाळीच्या सणात अवैधरीत्या दारूची विक्री, वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात तसेच परवान्याशिवाय मद्यपान करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमली आहेत त्यामुळे सावधान !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !