BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑक्टो, २०२२

पंढरपूर - सांगोला रस्त्यावर अपघातात आणखी एका वृद्धाचा मृत्यू !

 



शोध न्यूज : पंढरपूर - सांगोला मार्गावर आणखी एक अपघात झाला असून या अपघातात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या मार्गावर अशा प्रकारे वृद्धाचा अपघाती मृत्यू होण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. 


 मृत्यूचा महामार्ग अशीच ओळख पंढरपूर - सांगोला रस्त्याची बनली आहे.  पंढरपूरपासून सांगोल्यापर्यंत विविध ठिकाणे ही अपघाताची केंद्रे बनली असून आजवर अनेक अपघात गेल्या दोन वर्षात घडलेले आहेत. या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत तर कित्येक जखमी झाले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर अपघात कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली असून अमर्याद वेग हे या अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. बामणी, मांजरी या गावाच्या दरम्यान मात्र थांबलेल्या वाहनामुळे अपघात होताना दिसत आहेत. बामणी आणि मांजरी येथील वळण हे आधीपासूनच धोक्याचे ठरत असून समोरील वाहन न दिसल्यामुळे येथे अपघाताचा धोका सतत असतो. पादचाऱ्याना देखील जड वाहने उडवून जात आहेत.


गावाकडून आपल्या घराकडे निघालेल्या बामणी येथील वृद्ध पादचारी वृद्धास एक ट्रकने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेले मुरलीधर बापू साळुंखे यांचा अखेर मृत्यू झाला आहे. ७० वर्षे वयाच्या या वृद्धाला पाठीमागून जोरदार धडक देवून ट्रक चालक घटनास्थळी ट्रक सोडून पळून गेला आणि जबर मार लागलेल्या साळुंखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला आणि या रस्त्यावरील अपघाती मृत्यूची संख्या आणखी वाढली. (Accident, Pandharpur-Sangola road, Death of an old man) साळुंखे हे पंढरपूर - सांगोला रस्त्याने पायी चालत घराकडे निघाले होते तेंव्हा त्यांना एका मालट्रकने जोराची धडक दिली. यात त्यांना डोक्यासह अन्यत्रही मार लागला होता.


रस्ते चकाचक झाले असल्याने बेपर्वा वाहने चालवली जातात शिवाय  रस्त्यावर कशीही वाहने उभी केली जातात. समोरून आलेल्या वाहनाच्या प्रखर प्रकाशात ही उभी वाहने दिसत नाहीत त्यामुळे वेगात येणारे वाहन सरळ उभ्या वाहनावर जाऊन धडकून अपघात होत आहेत. याच मार्गावर याच महिन्यात मांजरी येथील एका वृद्धाचा अपघाती मृत्यू झाला होता. ६० वर्षीय शेतकरी वकील उस्मान मुजावर हे डाळिंब विक्रीसाठी सांगोला मार्केट यार्डात गेले होते. तेथून ते परत मांजरी गावाकडे येत असताना नरुटे वस्तीजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता आणि आता बामणी येथील वृद्धाचा याच रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. 

-----------------

शिरीष सरदेशपांडे 

पोलीस अधीक्षकांची बदली !

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून शिरीष सरदेशपांडे हे नवे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक असणार आहेत. नाशिक येथे पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे सरदेशपांडे हे सोलापूर येथे येत असून तेजस्वी सातपुते यांना मात्र पदस्थापना देण्यात आली नाही.  त्यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांचा नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील २४ पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने काढले आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !