BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑक्टो, २०२२

भारत - पाकिस्तान संघातील पहिला सामना संकटात !

 



शोध न्यूज : टी २० वर्ल्ड कप मधील भारत आणि पाकिस्तान संघातील पहिला सामनाच संकटात आला असून या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


क्रिकेट रसिकांना टी २० वर्ल्ड कपची मेजवानी मिळणार असून भारत आणि पाकिस्तान संघातील लढत पाहण्यासाठी रसिक आतुर झालेले आहेत. या दोन्ही संघामधील क्रिकेटचा थरार जागतिक पातळीवर पहिला जातो. टी २० वर्ल्ड कप स्पर्धा आता सुरु होत असून भारतीय प्रेक्षक देखील क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अधिर झालेले आहेत. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघातील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होत आहे. ऑस्ट्रेलियन वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता तर भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता होणार आहे. या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असतानाच क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली आहे.


मेलबर्न येथे याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पावसामुळे हा सामना रद्द देखील होऊ शकतो. या पावसामुळे त्या दिवशी टॉस देखील होऊ शकणार नाही अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रद्द झाल्यास क्रिकेट प्रेमींची मोठी निराशा होणार असून असे घडलेच तर दोन्ही संघाना प्रत्येक एक एक गुण दिला जाईल. विश्वचषक स्पर्धेत एकही दिवस राखीव ठेवण्यात आला नाही त्यामुळे रद्द झालेला सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार नाही. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा पाकिस्तानपेक्षा नेहमीच सरस राहिला असून विजयाचा ५-१ असा विक्रम आहे. मागील टी २० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झालेला होता. (The first match between India and Pakistan is in trouble)यावर्षीच्या स्पर्धेबाबत  मोठी उत्सुकता आहे पण क्रिकेट रसिकांसाठी पावसाची वाईट बातमी आलेली आहे. 

 

टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझम याची टीम : शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद तर राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी अशी आहे. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर अशी टीम खेळणार आहे. (The first match of the T20 World Cup between India and Pakistan has come under threat as the weather department has predicted heavy rain on this day.)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !