BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑक्टो, २०२२

शिवसेना नेत्यांच्या घरावर हल्ला. पेट्रोल बाटल्या, स्टंप आढळले !



शोध न्यूज :  शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असतानाच हा प्रकार घडला आहे.


शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असून ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील ते सडकून टीका करीत असून राणे यांच्या दोन मुलांना तर ते जमेलही धरीत नाहीत. जाधव हे कोकणातील नेते असून रोखठोक आणि मुद्देसूद बोलण्याबाबत ते प्रसिद्ध आहेत. भारतीय जनता पक्षाला ते सतत झोडपून काढतात त्यामुळे भाजपचाही मोठा राग त्यांच्यावर आहे. नुकताच त्यांच्या एका भाषणावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अशा गुन्ह्याला भास्कर जाधव हे भीक घालत नाहीत हे सगळ्यांना माहित असून आजही त्यांनी अशा तक्रारींची खिल्ली उडवली आहे. भास्कर जाधव यांच्या सुरक्षेचा विषय देखील नेहमी चर्चेत राहिला आहे आणि आता तर त्यांच्या निवासावर हल्ला करण्याचा प्रकार झाला असून  काही पुरावे समोर आले आहेत. 


भाजप आमदार नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक होत असतानाच भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. हा विषय एवढ्यावर थांबलेला नाही तर त्यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बाटल्या आणि स्टंप देखील आढळून आले आहेत. जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे आणि त्यांच्या दोन  मुलांच्या बाबत अत्यंत आक्रमक शब्दात टीका केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील आपल्या पद्धतीने उत्तर दिले होते.  आता मात्र भल्या सकाळी काही हल्लेखोरांनी भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. (Shiv Sena leader Bhaskar Jadhav's house attacked) हॉकीच्या स्टिक आणि पेट्रोलच्या बाटल्याही जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आल्या आहेत त्यामुळे हल्लेखोरांचा उद्देश देखील स्पष्ट होत आहे. ही घटना घडल्यानंतर जाधव यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली.


आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना भास्कर जाधव यांनी बोलताना राणे कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला होता. नारायण राणे म्हणजे कोंबडी चोर आणि त्यांचा मुलगा निलेश राणे म्हणजे 'चरसी' अशी खिल्ली जाधव यांनी उडवली होती आणि नारायण राणे यांची मिमिक्री देखील त्यांनी केली होती. दरम्यान भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजपचे काही कार्यकर्ते कणकवली पोलीस ठाण्यात गेले आणि जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितल्यावर कार्यकर्ते निघून गेले. कुडाळ पोलीस ठाण्यात भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

जाधवांचे आव्हान !

आपण १९९६ पासून व्यवसाय करतो हे सगळे काही कागदावर आहे. आपल्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर वडिलांची मालमत्ता वारसाहक्काने आपल्याकडे आली. नितेश राणे यांच्याकडेच माझ्यापेक्षा अधिक अभ्यास आहे पण त्यांनी आरोप सिद्ध केले आणि माझ्याकडे जर हिशोब नसेल तर मी आत्महत्या करीन. बापाच्या पैशावर नितेश राणे जगत असून त्यांचा स्वत:चा काहीही व्यवसाय नाही असा टोला देखील जाधव यांनी लगावला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !