BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑक्टो, २०२२

दोन खासदारांनी दिले तडकाफडकी राजीनामे !

 



शोध न्यूज : भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका खासदाराने रेलेवे मंडळाचे तडकाफडकी राजीनामे दिले असून खासदार आणि रेल्वे अधिकारी यांच्यातील मोठा बेबनाव समोर आला आहे. 


माढा मतदार संघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे समितीचे राजीनामे दिले असून रणजितसिंह निंबाळकर हे सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत तर ओमराजे हे सदस्य आहेत. विविध कामांच्या बाबतीत रेल्वे अधिकारी आणि खासदार यांच्यात मोठा बेबनाव निर्माण झाला आणि या दोघांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यामुळे रेल्वे विभागात मोठी खळबळ उडाली असून रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे या राजीनाम्यांची मोठी चर्चाही सुरु झाली आहे.


खासदारांनी काही मागण्या केल्या होत्या त्यात कोरोनामुळे बंद केलेले रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावेत ही मागणीही होती. खासदार मागणी करीत असले तरी रेल्वे अधिकारी आपल्या मर्जीनेच कारभार करत आहेत त्यामुळे वैतागून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या मंडळात एकूण ३६ खासदार हे सदस्य म्हणून काम पाहतात. रेल्वे समितीची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत रेल्वे प्रशासन आणि खासदार यांच्यात मोठी वादावादी झाली. त्यातून अध्यक्षासह अन्य खासदारांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे हा वाद किती टोकाचा होता हेच दिसून येत आहे. रेल्वे अधिकारी खासदारांच्या सूचना विचारात घेत नसल्याने हा उद्रेक झाला आहे. 


कोरोनामुळे रेल्वेचे काही थांबे बंद करण्यात आले होते ते पूर्ववत करण्यात यावेत आणि प्रवाशांची गैरसोय थांबविण्यात यावी. शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात तसेच रेल्वे अधिकार क्षेत्रातील  दोन गावांना जोडणारे रस्ते दुरुस्ती करण्यात यावी, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रेल्वे डब्यांचा कारखाना सुरु रहावा अशा विविध मागण्या खासदार करीत होते. वारंवार या मागण्या करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत आणि प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे खासदार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात जोरदार घमासान झाले. यातून खासदारांच्या राजीनाम्याचे प्रकरण घडले आहे त्यामुळे हा वाद आता अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.  


रेल्वेचे अधिकारी रेल्वे बोर्डाचे सदस्य असलेल्या खासदारांच्या मागणीला किंमत देत नाही त्यामुळे आपण अध्यक्षपदाचा राजिनामा देत असल्याचे आणि यापुढे रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले आहे. (MP Ranjitsinh Nimbalkar, Omraje Nimbalkar resign from Railway Board) या बैठकीस अन्य काही खासदारही उपस्थित होते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !