BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑक्टो, २०२२

पंढरपूर तालुक्यातील आणखी वाळू चोर चार तालुक्यातून हद्दपार !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातून आणखी दोन वाळू चोरांना चार तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असून आता मात्र काही प्रमाणात का होईना वाळू तस्करात खळबळ उडाली आहे. 


पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात असून ही वाळू विकून प्रचंड पैसा कमवला जात आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन सतत कारवाई करीत असतानाही वाळू चोरीला लगाम लागताना दिसत नाही. अवैधरीत्या नदीच्या पात्रातून दिवसरात्र वाळूची चोरी केली जात असते.  या वाळू उपशामुळे भीमा नदीत जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून हे खड्डे अनेकांचा जीव घेण्यास सज्ज असतात. बोटीचा वापर करून जेसीबी मशिनच्या सहाय्याने देखील रात्रभर उपसा सुरूच असतो तर गाढवावरून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. 


पोलिसांनी आणि  महसूल विभागाने अनेकदा वाळू चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे तसेच वाळू उपसा करणाऱ्या बोटी देखील नष्ट केल्या आहेत परंतु वाळू चोरीला आजीबात आला बसला नसल्याचे दिसून येते. अलीकडे प्रशासनाने वाळू चोरी करणाऱ्या टोळ्यांना हद्दपार करण्याची चांगली भूमिका घेतली असून यामुळे काही प्रमाणात का होईना वाळू चोरीला लगाम लागू लागला आहे. अलीकडेच दोन टोळ्यांना पंढरपूरसह काही तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यानंतरही वाळूचोरीच्या अवैध व्यवसायात असलेल्या आणखी दोघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 


पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारे टोळीतील सराईत गुन्हेगार टोळीप्रमुख सुरज हरिभाऊ शिंदे (वय २४ रा अनवली ता. पंढरपूर), आणि टोळी-सदस्य) समाधान मोहन घंटे (रा. रामबाग रोड, ता. पंढरपूर) यांचेविरूध्द पोलीस निरीक्षक श्री. अरूण पवार यांनी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे या दोघांविरुद्ध  प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवून  सदरबाबतचा सविस्तर अहवाल सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक  तेजस्वी सातपुते यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार  सदर इसमांना सोलापूर जिल्हयातील पंढरपूर शहर व तालुका, मंगळवेढा तालुका, माढा तालुका, माळशिरस तालुका या चार तालुक्यातून तीन महिने कालावधीकरीता हददपार करण्यात आले आहे.


याबाबतची नोटीस टोळीप्रमुख सुरज हरिभाऊ शिंदे आणि टोळीचा सदस्य समाधान मोहन घंटे यांना ताब्यात घेवून बजावण्यात आली आहे. या दोघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मालाविषयीचे, अवैध वाळूबाबतचे गुन्हे दाखल आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे, पोलीस नाईक महेश कांबळे, सचिन इंगळे यांनी ही कारवाई पूर्ण केली आहे. (Sand thieves in Pandharpur taluk deported from four talukas) अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे वाळू तस्कारात खळबळ उडाली असून अवैध वाळू व्यावसायिकात कायद्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. या करावाईचे जनतेतून चांगलेच स्वागत होऊ आहे.


    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !