BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑक्टो, २०२२

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, बारा जणांच्या विरोधात गुन्हा !

 



शोध न्यूज : जुगारीच्या अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून बारा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा तालुक्यात आणखी एकदा अशी कारवाई करण्यात आली आहे. 


सोलापूर जिल्ह्यात जुगारीबाबत मंगळवेढा तालुका सतत चर्चेत असतो आणि सतत मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील विविध गावात पोलीस जुगार अड्डे उध्वस्त करीत असतात. पोलिसांच्या कारवाया सतत सुरु असल्या तरी जुगारी मंडळी काही केल्या नियंत्रणात येत नसल्याचे दिसत आहे. मंगळवेढा तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याचे वारंवार होत असलेल्या पोलीस कारवाईतून समोर येत आहे. अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. जुगार हा प्रकार सगळीकडेच सुरु असला तरी मंगळवेढा तालुका मात्र याबाबत जिल्ह्यात आघाडीवर असल्याचेच दिसत आहे. प्रत्येक कारवाईत मोठ्या संख्येने जुगाररसिक अडकले जात असून मुद्देमालही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात येत असतो. आता पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई केली असून १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथे काका धाब्याच्या मागच्या बाजूस पैशावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बोराळे बीटचे पोलीस मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी खात्री करून घेतली. या ठिकाणी गोलाकार बसून बारा जण पैशावर ५२ पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जुगारीच्या ठिकाणी पोलिसांची धाड पडताच येथे एकाच खळबळ उडाली. जुगार खेळणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि या कारवाईतून वाचण्यासाठी तेथून निसटण्याचा प्रयत्न होऊ लागला. पोलिसांनी मात्र एकालाही तेथून हलून दिले नाही. (Police raid on gambling den, crime against twelve persons)पोलिसांनी जुगारीचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ लाख २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाच परंतु बारा जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.   


तामदर्डी गिराप्पा आप्पा पुजारी, काशिनाथ पाराप्पा पुजारी, महासिध्द औदुंबर मळगे क्लब चालक बापूराव दत्तात्रय कोकरे (तांडोर), बापूराव दत्तात्रय कोकरे (तांडोर), महेश हरीदास बेलभंडारे (पाकणी), महेश विठ्ठल कांबळे (वडापूर), दावल गनीसाब शेख (सिध्दापूर), सैफन रजाक शेख (सिध्दापूर), भागवत नागन्नाथ मळगे ( तांडोर), मदार अफसर शेख (तांडोर), हरिश्‍चंद्र प्रकाश कुंभारे (पाकणी) हे सदर ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !