BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑक्टो, २०२२

पोलीसानो,, भाविकांची वाहने अडवू नका - पोलीस अधीक्षकांचा इशारा



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची वाहने विनाकारण अडवून पोलिसांनी त्यांना त्रास दिल्यास मुळीच खपवून घेतले जाणार नाही असा इशाराच सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.


सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट ही प्रमुख देवस्थाने असून येथे राज्याच्या बाहेरून देखील भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. पंढरपूर येथे खाजगी वाहने घेवून येणाऱ्या भाविकांना पोलिसांकडून त्रास दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पर राज्यातून खाजगी बस घेवून भाविक पंढरीला येतात परंतु पंढरीत आल्यानंतर पोलिसांकडून विविध कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली भाविकांची अडवणूक केली जाते आणि यात भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पोलिसांच्या अडवणुकीपेक्षा पंढरपूर दर्शनाला न आलेले बरे अशी भावना त्रस्त भाविकांची होत असते. चिरीमिरीसाठी वसुलदार टपून बसलेले असतात परंतु आता यातून भाविकांची सुटका होणार असल्याचे दिसत आहे. 


पंढरपूर, अक्कलकोट शिवाय तुळजापूर येथे दर्शनासाठी भाविक सोलापूर जिल्ह्यात येतात. रस्त्यांची सुविधा झाली असल्यामुळे परराज्यातील भाविकांची संख्या देखील वाढलेली आहे परंतु अशा वाहनांना विनाकारण अडवून पोलीस कर्मचारी त्रास देत असल्यास खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे. यामुळे भाविकांचा मोठा त्रास आणि पोलिसांकडून होत असलेली अडवणूक यापासून सुटका होणार आहे. पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षकांनी वाहतुकीसंदर्भात अत्यंत स्पष्ट भाष्य केले आहे. अपघात नियंत्रणासाठी विशेष काम करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. (New Superintendent of Police warns the police) रस्ते अपघातात वाढ होत असून सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यात सोलापूर जिल्हा पहिल्या दहा जिल्ह्यात समाविष्ठ आहे त्यामुळे याकडे अधिक लक्ष दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने उपचार मिळावेत याकडे लक्ष देण्यात येणार असून वाहतुकीला स्वयंशिस्त लावण्यावर अधिक भर राहील, परराज्यातून किंवा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने विनाकारण रोखून त्यांना त्रास दिला जात असेल तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. जनताभिमुख पोलिसिंग राबविण्यावर आपला अधिक भर राहील तसेच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशा प्रकारे नियोजन करण्यात येईल. गुन्हेगारांना वठणीवर आणून अवैध व्यवसाय करणाऱ्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.


   (The new Superintendent of Police of Solapur Rural, Shirish Sardeshpande, has warned that if the police disturb the devotees coming to Solapur district by stopping their vehicles for no reason, they will not be tolerated.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !