BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑक्टो, २०२२

जमीनीसाठी जावयाने केला सासूचा खून !



शोध न्यूज : शेतजमीनीच्या हव्यासापोटी जावयाने सासूचा धारदार शस्त्राने खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सणासुदीच्या दिवसात कोकरे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. 


दिवाळीच्या सणाचा उत्साह सगळीकडे दिसत असून आनंदी वातावरणात काही दु:खद घटनाही घडताना दिसू लागल्या आहेत. दिवाळीच्या सणासाठी जावई मोठ्या प्रेमाने सासुरवाडीला येतात आणि मुलाच्या मायेनं सासू सासरे जावयाचा पाहुणचार करीत असतात. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मात्र ऐन दिवाळीच्या काळात आपल्याच सासूचे रक्त सांडले आहे. शेतजमीन गिळंकृत करण्याच्या प्रयत्नातून त्याने थेट आपल्या सासूलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडले. शेतजमीन नावावर करण्यासाठी अंगठा देत नसल्याने जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ (नंदेश्वर) हा चिडलेला होता. सासू सौ. शकुंतला मारुती कोकरे यांनी आपल्या वडिलाच्या नावावर असलेली जमीन नावावर करण्यासाठी संमती देत नाही हा राग राजाराम शेजाळ याला होता.


या रागातून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने सासू शाकुबाई कोकरे या ४७ वर्षे महिलेचा खून केल्याबाबत  मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मयत शाकुबाई आपल्या घरात मुलगी मोनाबाई, जावई दादा शेजाळ, मुली समृद्धी आणि समीक्षा हे घरात झोपले होते  यावेळी पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा का देत नाही म्हणून जावयाने चाकूने भोसकून सासूचा खून केला असावा असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. पोलिसांनी जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने मंगळवेढा तालुक्यात विशेषत: नंदेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  


सदर घटनेनंतर सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, (Son-in-law killed mother-in-law for land)मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनी अमोल बामणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. 



ASHOK GODAGE
Adv.
SHEKHAR GODAGE AND FAMILY





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !