BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२२

अपघातात भाविक पती पत्नीचा जागीच मृत्यू !





शोध न्यूज : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनास अपघात होऊन दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ भाविक जखमी झाले आहेत.


भाविकांची वाहने आणि अपघात हे एक समीकरण होऊन बसले असून देवदर्शनाला जाणाऱ्या वाहनांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अथणी येथील भाविक एका खाजगी वाहनातून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला भाविकांच्या टेंपोट्रॅक्सने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला.  राष्ट्रीय महामार्ग ५० वरील इंडी जिल्हा विजापूर येथील धुळखेड गावाजवळ झालेल्या या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अथणी येथील भैयाजी शिंदे (वय ५०) आणि सुमित्रा शिंदे (वय ४५) या दांपत्यांचा मृतात समावेश आहे. या अपघातात ९ पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे दर वर्षी असंख्य अपघात होताना दिसतात. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले की या वाहनांमुळे होणारे अपघात वाढत असतात. वाहतुकीचे कसलेही नियम न पाळता यमराजाचे रूप घेवून हे ट्रॅक्टर भर रस्त्यावरून लोकांचे जीव घेत धावत असतात. पाठीमागे रिफ्लेक्टर न लावता दिवसा आणि रात्रीही कुठेही, कशाही प्रकारे ट्रॅक्टर उभे केलेले असतात त्यामुळे पाठीमागून येणारे वाहन या ट्रॅक्टरना धडकून अपघात होतात. कर्णकर्कश आवाजातील गाणी लावत आणि अत्यंत बेपर्वाईने ट्रॅक्टर धावत असतात त्यामुळे गाळप हंगामाच्या काळात अशा अपघातांची संख्या लक्षणीय वाढत असते. (Devoted husband and wife died on the spot in an accident)नियमांचा राजरोस खून केला जात असतानाही त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण दिसत नाही. यंदाचा गाळप हंगाम  नुकताच सुरु झाला असून अशा अपघाताची पहिली घटना समोर आली आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !