शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे दोन गटात जोरदार मारारारी झाली असून याप्रकरणी दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एकूण ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील अमोल गुलाब गवळी यांनी कासेगाव येथील अनिल रामचंद्र येडगे, लक्ष्मण मारुती येडगे, मारुती रामचंद्र येडगे, संजय राजू पडवळकर, सिद्धनाथ आनंदा फुगारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार तनाळीजवळ असलेल्या आपल्या आईच्या शेतात अनिल येडगे आणि लक्ष्मण येडगे यांनी अतिक्रमण केले असल्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे तरीही अनिल येडगे आणि त्याच्या कुटुंबातील लोक त्रास देत असल्याचे म्हटले आहे.
आपण आपल्या तनाळी रोडवरील जमिनीजवळ असलेल्या रस्त्यावर थांबलो होतो त्यावेळी अनिल रामचंद्र येडगे, लक्ष्मण मारुती येडगे, मारुती रामचंद्र येडगे हे रस्त्याच्या कडेला वासे रोवत होते. वादाच्या जागेत वासे कशाला रोवता ? असा सवाल आईने त्यांना केला तेंव्हा त्यांनी आईला ढकलून दिले त्यामुळे आपण धावत तेथे गेलो. आपण आईला उठवले पण त्याचवेळी अनिल याने हातातील लोखंडी सळईने आपणास मारायला सुरुवात केली. लक्ष्मण आणि मारुती यांनी देखील लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने मारू लागले असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाण सुरु असतानाच मधुकर आणि महादेव हे आपले भाऊ भांडण सोडविण्यासाठी तेथे आले आणि त्यांना देखील गज, लाकडी दांडक्याने मारहाण सुरु केली.संजय राजू पडवळकर, सिद्धनाथ आनंदा फुगारे यांनी देखील हस्ती पाईप आणि गजाने मारहाण केली. सदर मारहाणीत आपल्यासह भाऊ, आई जखमी झाले असून उपचारासाठी पंढरपूर येथील रुगणालयात दाखल झाल्याचे अमोल गवळी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या फिर्यादीवरून अनिल रामचंद्र येडगे, लक्ष्मण मारुती येडगे, मारुती रामचंद्र येडगे, संजय राजू पडवळकर, सिद्धनाथ आनंदा फुगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गवळी यांच्या फिर्यादीवरून सदर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Heavy fighting between two groups in Pandharpur taluka)परंतु अनिल रामचंद्र येडगे यांनीही याबाबत तक्रार दिली आहे.
अनिल येडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुलाब भाऊ गवळी, अनिल गुलाब गवळी, मधुकर गुलाब गवळी, महादेव गुलाब गवळी यांच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी या चौघांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. नातीचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही मंडप उभारण्यासाठी चार लाकडी खांब उभे केले होते. मंडपाचे साहित्य उतरवले जात असताना अमोल गवळी तेथे आला आणि त्याने अमोल डूणे यास मंडपाचे साहित्य घेवून जा असे सांगत आपल्या मुलासह आपल्या शिवीगाळ केली.
येथे मंडप लावायचा नाही म्हणून धमकी देवून तो निघून गेला. काही वेळाने मात्र त्यांची तीन मुले अमोल गवळी आणि महादेव गवळी यांना घेवून तेथे आली. आम्हाला लाथा बुक्क्यांनी चौघांनी मारहाण सुरु केली. यावेळी माझी मुले, पुतणे भांडण सोडविण्यासाठी तेथे आले असता त्यानाही मारहाण करण्यात आली. लोखंडी गजाने मारहाण करून धमकी देवून तेथून निघून गेले. यात आम्ही सगळेच जखमी झालो अशा प्रकराची फिर्याद अनिल येडगे यांनी दिली असून त्यानुसार चौघाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !