BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

वीज पडून शेतातील पाच जण होरपळले !




शोध न्यूज : पावसापासून बचाव करायला गेले पण नेमकी वीज पडून पाच जण जखमी झाल्याची ग घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस होत आहे. या दरम्यान विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना सुरु आहेत. वीज पडण्याचा धोका सतत असताना पावसापासून बचाव करण्याचा चुकीचा प्रयत्न केल्यामुळे पाच जण भाजले आहेत. पाऊस पडत असताना आणि आकाशात विजांचे तांडव सुरु असताना झाडाखाली थांबू नये अशा सूचना कायम दिल्या जातात, कारण आकाशातून पडलेली वीज झाडांवर अथवा धातुकडे आकर्षित होत असते. त्यामुळे अशा काळात काळजी घेतली जावी असे आवाहन केले जाते. आजवर अनेकदा झाडांवरच वीज कोसळली आहे आणि हिरव्यागार झाडांनाही आग लागली आहे. लोखंडी वस्तूकडे देखील आकाशातून पडणारी वीज आकर्षित होत असते आणि अक्कलकोट तालुक्यातील काही लोकांनी लोखंडी कढईचाच आश्रय घेतला.


पाउस येऊ लागल्यामुळे कुरनूर शिवारात पाच जणांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील एका मोठ्या कढईचा आश्रय घेतला. विजांचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी म्हणून पाच जण लोखंडी कढईच्या आश्रयाला गेले. विजा कडाडत असताना जे करू नये असे सांगितले जाते तेच या पाच जणांनी केले आणि दुर्घटना घडली. शिवाजी पंढरी शिंदे (वय ७५), सुमित गुरप्पा कलशेट्टी (वय १२), गुरप्पा सुभाष कलशेट्टी (वय ४०), संभाजी शिवाजी मोरे (वय ३४) आणि अंबिका गुरप्पा कलशेट्टी (वय १३) हे पाच जण कढईच्या आश्रयाला जाऊन बसले. विशेष म्हणजे यात एका मुलाचा आणि एका मुलीचा देखील समावेश होता. 


आकाशात विजांचे थैमान सुरु होते आणि पाऊस कोसळत होता. याचवेळी आकाशातून वीज कोसळली आणि थेट लोखंडी कढईवर पडली. यामुळे आडोशाला बसलेले पाच जण भाजले गेले. यातील गुरप्पा कलशेट्टी, शिवाजी शिंदे हे जेष्ठ नागरिक आणि बारा वर्षे वयाचा सुमित शिंदे हे तिघे अधिकच भाजले गेले असून त्यांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल काण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (Five people injured by lightning in Solapur district) घटना मोठी घडली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून या घटनेत जिवितहानी झाली नाही. विजा कडाडत असताना नागरिकांनी तसेच शेतीत काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यात थोडीशी वेपार्वाई केल्यास अशा प्रकारच्या घटना घडू शकतात हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !