BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑक्टो, २०२२

पंढरीतील खड्डे बुजवा अन्यथा ------ ! प्रणिताताई भालके यांचा इशारा.

 


शोध न्यूज : पंढरीत जागोजागी पडलेले खड्डे बुजवा आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न करीत असलेली घाण स्वच्छ करण्याचे काम तातडीने हाती घ्या अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा प्रणिताताई भालके यांनी एका निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपालिकेस दिला आहे.

 

पंढरपूर शहरात जगदंबा वसाहत, अंबाबाई झोपडपट्टी, सेंट्रलनाका, लेंडकी नाला लगतचा परिसर, बाजारपेठ, भाजीमंडई, संतपेठ, भोसले चौक, दाळे गल्ली अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले.गटारी तुंबल्याने  मैलामिश्रीत पाणी लोकांच्या घरात गेले आणि रस्त्यावरही आले.  या नेहमीच्या समस्येवर  कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्लॅन तयार करुन रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम हाती घ्यावे. अनेक भागातील गटारी बुजवल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी वाटच नाही.त्यामुळे  लोकांच्या घरात, दुकानांत व रस्त्यावर पाणी साठून रहात आहे त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होत असून आरोग्यही धोक्यात आहे.


परतीच्या पावसामुळे दोन महिन्यांपूर्वी जे खड्डे बुजविले असताना पुन्हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे  वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातही वाढत आहेत. सरगम चौक येथील खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली असून ट्रॅफिक जाम होत आहे. हे सर्व खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत व सुरक्षीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच पंढरपूर शहारामध्ये कचऱ्याचे ढीग दिसत असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वेळेवर कचरा उचलण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. अनेक रस्त्यावर धुळ असल्यामुळे लोकांच्या नाकात, तोंडात, डोळ्यांत धूळ  जावून नागरिक आजारी पडत आहेत.  रस्त्यावरील धुळ काढणारी मशीन धुळ खात पडलेली आहे, खड्डे बुजवताना मुरुम टाकल्यामुळे रस्त्यावर धुळीचे  व मातीचे साम्राज्य वाढत आहे. यासर्व अडचणीवर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


नागरिकांच्या या समस्यांची नगरपालिकेने तातडीने दखल घेवून नागरिकांचा त्रास कमी करावा अन्यथापंढरपूर नगर परिषदेच्यासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराच प्रणीताताई भालके यांनी दिला आहे. (Fill potholes in Pandharpur city, Bhalke's demand) या निवेदनावर भालके यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, अरुण कोळी, संजय बंदपट्टे, अनिल अभंगराव, आप्पा राऊत, अनंत महाराज नाईकनवरे, नगरसेवक प्रशांत शिंदे, सुधीर धोत्रे, सुरज पावले, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !